सुधीर कांबळे याच्या मरेकऱ्यावर ३०२ गुन्हा दाखल करून न्यायाच्या दिशेने सूत्र हलवा नाहीतर
महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करू भिम आर्मी लातुर जिल्हा टीमच्या वतीने इशारा
लातुर ; प्रतिनिधी
आज दिनांक २२/११ /२०२०/ रोजी भिम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा लातुर टीम व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा उत्तरेश्वर कांबळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा ऍड अखिलजी शाक्य यांनी सुधीर कांबळे कुटुंबियांचे केले सांत्वन
च्या नंतर आरोपीवर खालील प्रकारचे गुन्हे दाखल करत आरोपीना पळ वाट कडून दिलेत की काय ?असा संशय व्यक्त केला जात आहे
लातुर जिल्हातील औसा तालुक्यात मौजे कार्ला गावात जाती द्वेषातून बौद्ध समाजातील सुधीर कांबळे या तरुणांची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती,
सुधीर कांबळे या तरुणांनाचे गावातील वैष्णवी घोडके नामक मुलीसोबत अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते ते प्रेम प्रकरण मुलींकडील आई वडील भाऊ चुलते आजोबा व इतर नातेवाईकांना मान्य नसले मुळे त्यांनी सुधीरला व त्याच्या आई वडिलांना जीवे ठार मारण्याची अनेकदा धमकी दिली होती, दिनांक ११/११/२०२०/ रोजी सुधीर च्या फोन वर संध्याकाळी अंदाजे ९ ते १० वाजताच्या सुमारास फोन आला असता सुधीर हा बाहेर गेला ते रात्रभर घरी आलाच नाही संध्याकाळ ची वेळ असल्याने आई वडील उद्या सकाळी बगता येईल म्हणून झोपले असता दिनांक १२/११/२०२०/ रोजी सकाळी नागोबा मंदिरच्या वडाच्या झाडाला कोणतरी फाशी घेऊन कोणतरी लटकत आहे असे कळल्यावर सुधीर ची आई वडील चुलते त्या दिशेने गेले असता ,त्या ठिकाणी आपला सुधीर आहे हे पाहून त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता सुधीर चा घात झाला त्याला जीवे ठार मारून फासावर लटकावून आत्महत्या चा बेबनाव करत मुलीचे वडील भाऊ आजोबा चुलते यानी सुधीरची हत्या करून त्यांची मुलगी वैष्णवी चे घाई घाईत लग्न लावून आरोपी हे फरार झाले मात्र किल्लारी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत उशिरा आरोपीवर ३०२ गुन्हा नोंद न करता त्यांचेवर (आरोपीवर)३०६ ,१४३, ३२३, ५०४, ५०६, ३(१)r ३(१)s ३,(२) va शंकर सुरेश घोडके, राजू सुरेश घोडके ,ओम सुरेश घोडके , गणेश शंकर घोडके, सुरेश बंडाप्पा घोडके यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला पण ३०२ हा गुन्हा का करण्यात आला नाही हे सुधीर चे नातेवाईक विचारत असताना त्यांचेवर दबाव आणत आई वडील व त्याच्या म्हणयानुसार गुन्हा नोंदवला नसल्याचा किल्लारी पोलिसांवर आरोप आहे तरी सुधीरच्या मारेकऱ्यावर ३०२ गुन्हा नोंदवण्यात यावे सुधीर च्या आई वडिलांचे पुनर्वसन करून तात्काळ न्याय मिळावा म्हणून फास्ट्रेक कोर्टात केस चालवावी पुरवणी जबाब तात्काळ घेण्यात यावा पोस्टमार्टेम देण्यास विलंब करूनये
जर का असे नाही झाले तर जशास तसे उत्तर देऊ असे भिम आर्मी भारत एकता मिशन लातुर यांनी जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे
यावे वेळी निवेदनावर भिम आर्मीच्य अनेक कार्यकर्त्यानी स्वाक्षरी केलेल्या आहे
[ सुधीर कांबळे याची आई राजाबाई कांबळे
सदरील प्रकरणात पोलीस प्रशासनाने निःपक्षपाती पणे सखोलपणे चौकशी करावी 3 आरोपी अटक आहेत म्हणून चौकशी चालू आहे असे न म्हणता उर्वरित दोन आरोपी व सुधीर चे दोन मित्र याची ही सखोल चौकशी करावी हत्येच्या प्रकरणाला वेगळे वळण देऊ नये
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.