योगिता सावंत हिचा श्री महादेव मंदिर देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत कार्यालय भुतमूगळी यांच्या वतीने जाहीर सत्कार..
एस ए काज़ी
बीड येथील विद्यावार्ता मॅगझिनच्या वतीने आयोजित गांधी दर्शन राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत कुमारी योग्यता नेताजी सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावून भुतमूगळी
गावच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलेबद्दल श्री महादेव मंदिर देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत कार्यालय भुतमूगळी यांच्या संयुक्त विद्यमाने तिचा भव्य जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ग्रामदैवत शंभू महादेवाची आरती करून विकास रत्न, लोकप्रिय उपसरपंच मा. श्री. सतीशराव चव्हाण व महादेव मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. सुधाकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधून, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन योगिताचा व पालकांचा भव्य सत्कार करण्यात आला व बँड ताशाच्या गजरात गावात पेढे वाटप करण्यात आले. एम.टी.एस., स्कॉलरशिप शिष्यवृत्तीस पात्र ठरणारी, कराटे चॅम्पियन गोल्ड मेडलिस्ट, अनेक वेळा जिल्हास्तरावर वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या योगितानी यावेळी वकृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून एक नवीन इतिहास रचला व भुतमूगळी गावचे नाव रोशन केले. तिच्या या यशाबद्दल भूतमुगळी गावचे सरपंच विकास रत्न मा. श्री. मधुकरराव गायकवाड, चेअरमन रामकिशन सावंत, पोलीस पाटील पांडुरंग पाटील, माजी चेअरमन नारायण सावंत, माजी सरपंच विजयकुमार चव्हाण,माजी तंटा मुक्ती अध्यक्ष दाजीबा सावंत, आजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ पाटील, कालिदास चव्हाण, संजय स्वामी, संजय पाटील,नेताजी पाटील, शिवाजी पाटील , हरिभाऊ चव्हाण,वामन पाटील प्रकाश वाडीकर, बालाजी सावंत, लिंबराज पाटील, अंगद बापू , तुकाराम डोंगरगावे, ओम नेलवाडे, जीवन सावंत, आकाश सावंत, मोहन सावंत, गोविंद सावंत, संतोष सावंत, तानाजी सावंत, नागोराव सावंत, मनोहर सावंत, दत्ता सावंत,दगडू सावंत, बालाजी चव्हाण, हरिभाऊ सावंत, किरण सावंत, श्रीधर पवार, शिवरे सचिन, युवराज गुरुजी, चव्हाण सचिन सर, माधव सोनटक्के, प्रताप सोळुंके तसेच गावातील अबाल वृद्धांनी योगितावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आज शाळा बंद जरी असल्या तरी देखील भुतमूगळी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन माहिती मिळवून यश मिळवित आहेत, हेच कोरोनाच्या महामारीत शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे हे सिद्ध होते.
प्रशंसनीय विशेष बाब म्हणजे सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी कबड्डी व इतर स्पर्धेचे आयोजन करून बक्षीस वितरण केले जाते, तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री गुंडरे ज्ञानदेव व महर्षी दयानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय मोरे यांच्याशी सुसंवाद साधून गेट उभारणी, इमारत दुरुस्ती, इलर्निगची सुविधा,इत्यादी च्या माध्यमातून शाळेचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.
तसेच राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजना गावांतर्गत रस्ते दलित सुधार वस्ती योजना अंतर्गत वीज व रस्त्याचे कामे भुतमूगळी ते मदनसुरी रस्ता डांबरीकरण पानंद रस्ते तयार करणे संपूर्ण गाव व्यसनमुक्त करणे इत्यादीच्या माध्यमातून भुतमूगळी गावचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.