औसा तालुक्यातील ७९ सरपंच पदे आरक्षीत
औसा मुख्तार मणियार: औसा तालुक्यातील आज प्रशासकीय इमारत सभागृहात आरक्षण सोडत १०९ ग्रामपंचायत साठी २०२० -२०२५ या पाच वर्षासाठी काढण्यात आले. औसा रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण मारुती कांबळे या लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढून काढण्यात आल्या. यात अनुसूचित जातीसाठी १९, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकाचा मागास प्रवर्ग २९ व खुल्या प्रवर्गातील महिला साठी ३० ग्राम पंचायत सरपंच पदाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जमाती साठी गांजनखेडा, अनुसूचित जाती महिलासाठी उटी बु, कमालपूर, खुंटेगाव, बोरगाव न, रामेगाव, जवळगा पो, एरंडी, चिंचोली काजळे, कुमठा तर अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी कोरंगळा, येळी, तावशीताड, दावतपुर, लेखणगाव, उजनी, आलमला, तुंगी बू, किनिनवरे अशी २९ पदे आरक्षित आहेत. नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला टाका, वानवडा, देवताळा, मालेगाव, चिंचोली जोगण, कवठा लातूर, लोदगा, शिवली, मसलगा खु, येलोरी वाडी, हसाळा एकंबी, उंबडगा बु, फत्तेपूर, समदर्गा तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी करजगाव, गोंद्री, भुसनी, धानोरा, पारधेवाडी, उत्का, तपसे चिंचोली, भेटा, बेलकुडं, वांगजी अपचुंदा, लामजना, चलबुर्गा, भंगेवाडी अशी २९ पदे आरक्षित आहेत. तर सर्व साधारण महिला साठी बुधोडा, सेलू, किनी थोट, जयनगर, वाघोली, हसेगाववाडी, शिंदाळा
जहागीर, सारोळा, खरोसा, काला, जावळी,
नागरसोगा, आशिव, गुळखेडा, येलोरी
येळवट, भादा, कावठा केज, काळमाथा,
बोरफळ, ब-हाणपूर, शिंदाळावाडी, जायफळ,
वडजी, मासूीं, मातोळा, कवळी, सिरसल हे
३० सरपंच पदे आरक्षित आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.