लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांचे दिवस भरले काय ?

 लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांचे दिवस भरले काय ?  





*{ व्यंकटराव पनाळे - जिल्हा प्रतिनिधी }*

लातुर : दि. १८ - जिल्हा परिषदेच्या दि. १० नोव्हेंबर २०२० च्या सर्वसाधारण सभेत सभागृहाची दिशाभूल करण्यात पटाईत ठरलेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांची लबाडी सभागृहातच जिल्हा परिषदेचे अभ्यासू सदस्य संतोष वाघमारे यांनी उघड केली. 

त्यानंतरच माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी उदगीर येथील शालेय पोषण आहार चोरी प्रकरणातील शामार्य कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते पंडित यांच्यावर संस्थाचालकाने कार्यवाही नाही केल्यास आठ दिवसात आपण त्यांच्यावर कार्यवाही करू असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. प्रत्यक्षात औदुंबर उकिरडे यांना श्रीमती तृप्ती ज्ञाते पंडित यांच्यावर कार्यवाही करायचीच नाही हे त्यांच्या वर्तणुकीवरुन स्पष्ट दिसते. शामार्य कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते पंडित यांचे मेहुणे लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी जिल्हा परिषदेत येऊन औदुंबर उकिरडे यांची *अर्थ* पूर्ण भेट घेऊन ही कार्यवाही करू नये यासाठीची झालेली शिष्टाई लपून राहिलेली नाही. मात्र सर्वसाधारण सभेत शालेय पोषण आहार चोरी प्रकरणावरील चर्चा थांबवण्यासाठी, श्रीमती तृप्ती ज्ञाते पंडित यांच्यावर संस्थाचालकाने कार्यवाही नाही केल्यास आपण करू असे उत्तर सभागृहात औदुंबर उकिरडे यांनी दिले होते. ते ८ दिवस औदुंबर उकिरडे यांचे भरून गेले आहेत काय ? औदुंबर उकिरडे शामार्य कन्या विद्यालयाच्या शालेय पोषण आहार चोरीप्रकरणी आता तरी कार्यवाही करतील काय ? 

(व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या