उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील सरव्यवस्थापक गायकवाडांचा अजब कारभार ! संचालक मंडळ करत होते काय ?

 उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील सरव्यवस्थापक गायकवाडांचा अजब कारभार ! 

संचालक मंडळ करत होते काय ?





*{ व्यंकटराव पनाळे}* 

लातुर : दि. १९ - उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अनेक लफडे बाहेर येत आहेत. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेमध्ये कर्जवाटपात होणारा भ्रष्टाचार त्याच बरोबर हितसंबंध असलेल्या लोकांच्या व अधिकारी आणि संचालकांच्या जवळील नातेवाईकांच्या कर्जमाफीत होणारा भ्रष्टाचार असे अनेक किस्से आता सभासदांच्या समोर येत आहेत. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील संचालक हे कांही संचालकांच्या समोर बहुतांशी संचालक नंदीबैलाचेच काम करतात असे सभासदांमध्ये  बोलले जात आहे. व तसेच चित्र स्पष्ट होत आहे. 

असेच एक प्रकरण उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील कर्मचारी असलेल्या सिद्धेश्वर दिलीप गायकवाड यांचे लोकाधिकार कडे आले आहे.  

सिद्धेश्वर दिलीप गायकवाड यांचे विरुद्ध जनरल मॅनेंजर रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर येथे तक्रार दाखल झाली आहे. हे संचालकांना माहित आहे काय ?  सिद्धेश्वर दिलीप गायकवाड हे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या सध्या सरव्यवस्थापक पदावर अधिकारी असलेल्या गायकवाड महादेव बंकट यांचे पुतणे असून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या एका शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, हे बरोबर आहे काय ?सिद्धेश्वर दिलीप गायकवाड यांनी बँकेकडून नौकरी लागण्या अगोदरच त्यांचे चुलते कळंब येथे शाखाधिकारी असताना कर्ज घेतले होते, हे खरे आहे काय ? 

सिद्धेश्वर दिलीप गायकवाड यांनी ते कर्ज दि. १४/११/२०१९ रोजी भरणा केले परंतु खाते क्रमांक ०८१३५१०००००९९० मध्ये  २,३६,८७५ रु. एवढी सूट घेतली. व खाते क्रमांक ०८५०३५७००००० मध्ये ११२,७४३ रु. एवढी सूट घेतली. अशी एकूण एकत्रित ३,४९,६१८ रु. एवढी सूट घेतली. हे बरोबर आहे काय ? वास्तविक पाहता रिझर्व्ह बँकेच्या साल सन २०१८ - २०१९ च्या काळातील ऑडिट करणाऱ्या रिझर्व बँकेच्या ऑडिटरनी सदरील सिद्धेश्वर गायकवाड यांचे कर्ज, नोटीस मध्ये मिटवता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले असताना देखील महादेव बंकट गायकवाड यांनी आपण जनरल मॅनेंजर आहोत आपले कोण काय करणार ? या अविर्भावात सरव्यवस्थापक पदावर अधिकारी असलेल्या गायकवाड यांनी त्यांच्या पुतण्याचे कर्ज भरणा करून घेतले. 

त्यापुढील कहर म्हणजे ओटीएस ची अशी प्रकरणे मान्यतेसाठी बँकेच्या मुख्यालयास पाठवली जातात परंतु या जनरल मॅनेंजरनी हे प्रकरण मुख्यालयास येऊच दिले नाही. व या प्रकरणास कसल्याही प्रकारची बोर्डाची मंजुरीही घेतलेली नाही, हे बरोबर आहे काय?  ओटीएस प्रकरणाची मंजुरी मुख्यालयात पाहावयास मिळेल तेव्हा हे पाहण्याची हिम्मत तरी सर्व संचालकात आहे काय ? या कर्ज प्रकरणाची मंजुरी का घेतली नाही याचा खुलासा सरव्यवस्थापक महादेव बंकट गायकवाड यांना संचालक मागतील काय ?  खाते बेबाक करत असताना फक्त ट्रान्सफर असे पर्टिक्युलर देऊन चलने मारली, परंतु ती व्याज वसुलीला नावे टाकून कर्जात जमा घेतले. हे बरोबर आहे काय ? त्या चलनाची व खाते उतारा याची प्रत लोकाधिकार कडे उपलब्ध आहे. 

या दोन्ही कर्जामध्ये सध्या शाखा अधिकारी या पदावर कार्यरत असताना सिद्धेश्वर दिलीप गायकवाड यांना एवढी कर्ज माफी का दिली ? वास्तविक पाहता बँकेच्या कर्मचाऱ्यास माफी देता येत नाही. असे असताना सुद्धा कर्जमाफी देण्यात आली. हे बरोबर आहे काय ?  सिद्धेश्वर दिलीप गायकवाड हे केवळ जनरल मॅनेंजरचे पुतणे आहेत म्हणून ही सवलत दिली आहे का ? व त्या ओटीएस ला उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या मुख्यालयाची व बोर्डाची परवानगी का घेतली नाही ? याचा खुलासा  बँकेचे सरव्यवस्थापक महादेव बंकट गायकवाड करतील का ? 

 या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी बँकेच्या सभासदांची, ठेवीदारांची व हितचिंतकांची मागणी आहे. 

(व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या