औशात 6 डिसेंबर " काळा दिवस " म्हणून निषेध व्यक्त..

 औशात 6 डिसेंबर " काळा दिवस " म्हणून निषेध व्यक्त... 



एस ए काज़ी 







औसा प्रतिनिधी/- भारतीय प्रजासत्ताक संविधान एकात्मता, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वीकृत तसेच सर्वधर्म समभाव समाजात काही समाज कंटकांनी समाज विघातक कृत्य करत 6 डिसेंबर 1992 रोजी देशाच्या एकात्मतेची प्रतिक तसेच ऐतिहासिक वारसा असलेली बाबरी मस्जिद विध्वंस घडवून आणली व  देशाच्या अस्मितेला काळीमा फासणारी घटना घडून जातीय दंगली भडकल्या व भारतीय संपत्तीची हानी झाली. त्या घटनेस कारणीभूत ठरलेल्या समाज कंटकांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आज दि. 6 डिसेंबर 2020 रविवार रोजी ठीक 11:00 वाजता औसा येथे एमआयएम पक्षाच्यावतीने औसा तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदने देत दंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. बाबरी मस्जिद पतन झाल्यानंतर देशात जातीय दंगली घडल्या तसेच समाजातील गोरगरीब व्यक्तींची कत्तली झाल्या व जातीय दंगलीत भरडल्या गेलेल्या व  दोन्ही समाजात कत्तली घडल्या व मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. तसेच पीडित व्यक्तींना व त्यांच्या परिवारांना न्याय मिळावे व मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या  समाज कंटकांवर कठोर कारवाई च शिक्षा व्हावी यासाठी औसा एमआयएम तर्फे काळ्या फिती दंडावर बांधून निषेध व्यक्त करत औसा तहसिलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर अॅड. गफरुल्ला हाश्मी, एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, अॅड. असगर पटेल, अॅड. रफिक शेख, अॅड. जहीर अहमद, न्यामत लोहारे, सय्यद फजले रहीम, नईम शेख, अलीम शेख, मुशीर शेख, शिराज शेख, अझर कुरेशी, शेख सलिम, इल्यास चौधरी, सय्यद नजीबोद्दीन यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या