पदवीधर मतदार संघासाठी औसा तालुक्यात सरासरी 77 टक्के मतदान

 पदवीधर मतदार संघासाठी औसा तालुक्यात सरासरी 77 टक्के मतदान 



औसा प्रतिनिधी


 मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत औसा तालुक्यातील 9 मतदान केंद्रावर सरासरी 77 टक्के मतदान झाले, या निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक मैदानात उभे होते, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात प्रमुख लढत असल्याची चर्चा असून इतर पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणुकीत उभे होते ,तालुक्यात एकूण मतदान केंद्रावर 3320 मतदारांपैकी एकूण 2 हजार 336 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदान केंद्र निहाय व एकूण झालेले मतदान  पुढील प्रमाणे औसा 1199  ( 890 ),भादा 286 ( 209 )  बेलकुंड 256 ( 168 ) मातोळा 378 ( 258 ) किल्लारी 294 ( 224 ) लामजना 264 ( 192 ) किनी थोटे 283 ( 183 ) आणि उजनी 260 ( 225 ) ,कंसातील आकडे केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची आहेत ,अशी माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागा मार्फत देण्यात आली ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या