सोयाबीनच्या बोगस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
औसा (प्रतिनिधी) दि.३ खरीप हंगामात जून महिन्यात पेरणी करतांना सोयाबीन बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकले व बोगस बियाणे उगवले नसल्यामुळे विक्रेत्यावर औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती अशी की जून 2020 मध्ये खरीप हंगामात सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकण्यात आले बोगस बियाणे उगवले नसल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणी मुळे खर्च होऊन आर्थिक नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यामुळे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी महारूद्र रामहरी मोरे यांच्या फिर्यादीवरून कृषीधन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बोगस बियाणे कंपनी बियाणे उत्पादन करून विक्री केल्याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तसेच मांजरा कंपनीच्या बियाण्या बाबतही तक्रार देण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर 164 / 2020 कलम 420 भादवि व बियाणे कायदा 1966 क 6 ब नियम 1968 अंतर्गत 23 अ नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत कृषीधन मांजरा सीड्स बियाणे उत्पादक कंपनीसह औसा निलंगा लातूर तालुक्यातील सतरा कृषी सेवा केंद्र चालकांनी पोलिसांनी नोटिसा बजावून चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती हाती आली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.