अपंग जनता दलातर्फे औशात दिंव्यांगांचा सत्कार

 अपंग जनता दलातर्फे औशात दिंव्यांगांचा सत्कार.







औसा प्रतिनिधी /-अपंग जनता दल सामाजिक संघटना लातूर जिल्हाध्यक्ष शंकर सर्जे‌ यांच्या  मार्गदर्शनाखाली जागतिक अपंग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. दि. ३ डिसेंबर  जागतिक अपंग दिनानिमित्त औसा तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. आत्माराम मिरकले जिल्हा महासचिव, औसा तालुका अध्यक्ष युवराज भोले, औसा महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई चिल्ले, औसा तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ मुळे, औसा तालुका महासचिव सूर्यकांत पवार, यांच्यासह कार्यक्रमास पत्रकार  राम कांबळे, विष्णू खुरपे, गहिनीनाथ मिरकले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या