मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय संचालक मंडळावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी द्या: एम आय एमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार

 राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय संचालक मंडळावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी द्या: एम आय एमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची मागणी





औसा मुख्तार मणियार

राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वरील प्रशासकीय संचालक मंडळावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी द्यावी या मागणीसाठी एम आय एम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार औसा यांनी औसा तहसीलदार मार्फत दिनांक सात डिसेंबर 2020 सोमवार रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे. महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपला असून कोव्हिड-१९ मुळे निवडणुका घेतल्या नसल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरु आहेत. राज्य शासनाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त करताना महाविकास आघाडीच्या समविचारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी देऊन इतर पक्षातील कार्यकर्त्यांना व शेतकरी प्रतिनिधीस व व सामाजिक कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करण्याची संधी द्यावी अथवा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना औसा तहसीलदार मार्फत एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी या निवेदनावर  एमआयएम पक्षाचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या