वंचित बहुजन आघाडीचे महामहीम राष्ट्रपती यानाच पाठवले लेखी निवेदन .
भूम
केंद्र सरकारने शेतकरी विरोधात जे तीन विधेयके मंजूर केलेले आहेत ते तात्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने स्वतंत्रपणे तहसीलदार यांचेमार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवले .
सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी केंद्र शासनाने घेतलेल्या शेतकरी विरोधी विधेयक कृषी विधेयक रद्द करावे ते मागे घ्यावे यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने तसेच विविध संघटनेच्यावतीने देशभर आंदोलन केले आहेया आंदोलनामध्ये व्यापारी संघटनांचा ही तेवढाच प्रतिसाद मिळाला आहे
याच मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वतंत्रपणे लेखी निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदार यांचेमार्फत लेखी निवेदन पाठवले आहे . या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते मुकुंद लगाडे . तालुका अध्यक्ष सुभाष जावळे .कार्यकर्ते अनिल भालेराव . अंकुश थोरात .नारायण मस्के आदिच्या सह्या आहेत

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.