आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा आणि निलंगा येथे स्वतंत्र आढावा बैठका घेऊन मतदारसंघातील विकासकामांचा आणि मनरेगा अंतर्गत कामांचा आढावा घेतला!
औसा मुख्तार मणियार
मनरेगा तून ग्रामविकास साधणारा विकासाचा औसा पॅटर्न विकसित करण्याच्या संकल्पानुसार दि ८ डिसेंबर २०२० मंगळवार रोजी औसा आणि निलंगा येथे स्वतंत्र बैठका घेतल्या. या बैठकीत "शेतरस्ते ही शेतीची नस असते त्यामुळे नकाशावरील सर्व शेतरस्ते ३१ मार्च पर्यंत अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना मोकळे करण्यासाठी धडक मोहीम हाती घ्यावी. मनरेगा तून प्रत्येक गावासाठी ४ रस्ते मंजूर करून त्यातील २ रस्त्यांचे काम तात्काळ सुरू होईल असे नियोजन करा. येत्या काळात प्रत्येक गावात किमान २५ एकरमध्ये फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेऊन वृक्षलागवडीचा बिहार पॅटर्न राबवा" अशा सुचना दोन्ही आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या.
जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचून सोडविण्यासाठी लवकरच सर्कलनिहाय #जनता #दरबार घेणार असल्याची माहितीही या बैठकीत दिली.
औसा येथील आढावा बैठकीला औसा उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे, तहसीलदार सौ शोभा पुजारी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री पाटील, नायब तहसीलदार श्री कानडे, भाजप औसा तालुकाध्यक्ष श्री सुभाष जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री काकासाहेब मोरे, जि. प. सदस्य श्री सुभाष पवार,पं. स. सदस्य श्री गोविंद मुडबे, श्री संजय कुलकर्णी तर निलंगा येथील आढावा बैठकीला निलंगा उपविभागीय अधिकारी श्री विकास माने, तहसीलदार श्री गणेश जाधव, गटविकास अधिकारी श्री अमोल ताकभाते, कृषी अधिकारी श्री राजेंद्र काळे, भाजप कासार सिरसी मंडळाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वाकडे, श्री जिलानी बागवान, श्री नितिन पाटील, मतदारसंघातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.