लातूर- गुलबर्गा हि रेल्वे औसा मार्गे जावी यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हनमंत राचट्टे यांचा जाहीर पाठिंबा

 लातूर- गुलबर्गा हि रेल्वे औसा मार्गे जावी यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हनुमंत राचट्टे यांचा जाहीर पाठिंबा

औसा मुख्तार मणियार





लातूर गुलबर्गा रेल्वे औसा मार्गे जावी यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हनुमंत राचट्टे यांनी दि. 30 नोव्हेंबर दोन हजार वीस सोमवार रोजी  औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीला जाहीर पाठिंबा एका निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे. औसा विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा च्या वतीने सध्या चालू असलेल्या लातूर गुलबर्गा रेल्वे मार्ग हा नियोजित औसा तालुका मार्गाने जाण्यासाठी पाठपुरवठा साठी औसा तालुक्यात आपण सर्व मान्यवरांनी स्थापन केलेल्या औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीच्या पुढील शासन दरबारी मागणी मान्य करण्यासाठी जे काही नियोजित लोकशाही मार्गाने आंदोलने करतील त्यांना विधानसभा युवक काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा व सक्रिय सहभाग असेल असे मी या पत्राद्वारे घोषित केले आहे. असे जाहीर पाठिंब्याचे पत्र औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीला युवक काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव राचट्टे यांनी दिले आहे .या निवेदनावर हनुमंत राचट्टे यांची स्वाक्षरी आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या