करणी सेनेच्या वतीने रेल्वे हक्क संघर्ष समितीला जाहीर पाठिंबा
औसा मुख्तार मणियार
*लातूर ते गुलबर्गा रेल्वे औसा मार्गेच जावी या मागनीसाठी करणी सेना संघटना मराठवाडा यांच्या
मार्फत दि १० डिसेंबर २०२०गुरुवार रोजी औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितिला जाहीर पाठिंबाचे लेखी पत्र मराठवाड्याचे कार्याध्यक्ष जयपालसिंह ठाकुर, यांच्या हस्ते देण्यात आले.या लेखी पत्रा मध्ये असे नमूद केले आहे. आपण प्रस्तावित लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा मार्गे जावी यासाठी आपण रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून औसा तालुक्याच्या हक्काच्या रेल्वेसाठी मागणी करीत आहात. ही मागणी अगदी रास्त आहे किंबहुना ती आपल्या औसा तालुक्याच्या हक्काची आहे. औशाच्या विकासासाठी औशाला रेल्वे आलीच पाहिजे या मागणीस मी करणी सेना च्या वतीने जाहीर पाठिंबा देतो व वेळोवेळी करणी सेना आपल्या सोबत औशासाठी होणाऱ्या आंदोलनामध्ये सुद्धा संपूर्ण ताकदीने सोबत राहील याची खात्री देतो. आपल्या या कार्यास समस्त करणी सैनिकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो.अशा पाठिंब्याचे पत्र करणी सेनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी करणी सेना चे मराठवाडा कार्याध्यक्ष जयपाल सिंह ठाकुर, जमादार अनिल, गोविंद परिहार, विशाल परीहार,पदमाकर तौर आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.