मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आयुक्तांना प्रतिकात्मक कुत्र्याची भेट
विधायक कामासाठी भाजपाचा पुढाकार ः लातूर मनपा आयुक्तांना निवेदन
विधायक कामासाठी भाजपाचा पुढाकार ः लातूर मनपा आयुक्तांना निवेदन
लातूर दि.08/12/2020
लातूर शहरातील लोकसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा देणे ही काँगे्रस पक्षाच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या लातूर महानगरपालिकेला शक्य होत नाही. त्यातच मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे लातूरकरांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत लातूर महानगरपलिकेकडे कुठलीच यंत्रणा नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लातूरकरांचे आरोग्य अबाधीत राहण्यासाठी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लातूर महानगरपालिकेने करावा, अशा मागणीचे निवेदन व कुत्र्याची प्रतिकात्मक भेट देवून भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, मनपा सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेेकर, नगरसेवक सुनिल मलवाड यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यात आलेला आहे.
लातूर शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लातूर शहरात सध्या 35 हजारांच्या संख्येने मोकाट कुत्रे फिरत आहेत. यामध्ये दिवसाकाठी नवीन 400 ते 500 मोकाट नवीन कुत्र्यांची संख्या वाढत आहे. यातील बहुतांश कुत्री असंख्य रोगांनी त्रस्त आहेत. याकडे ना मनपाचे लक्ष आहे. पशुचिकीत्सक विभागाचे त्यामुळे लातूर शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मनपाकडे या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कुठलीच यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण होत आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी लातूर महानगरपालिकेकडे यंत्रणाच नसल्यामुळे अबाल-वृध्द व चिमुकल्यांना मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटणेला सामोरे जावे लागत आहे. हे वास्तव असले तरी लातूर महानगरपलिका मात्र, या प्रश्नाबाबत गंभीर नाही. त्यामुळे लातूरकरांना दिवसरात्र भीतीच्या सावटाखाली वावर करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लातूर शहर महानगरपालिकेचे कर्तव्य म्हणून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यासाठी निविदा काढावी आणि पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करावा अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीने आंदोलन करता येईल, असा ईशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे,मनपा सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे.
या निवेदनावर नगरसेवक सुनिल मलवाड, नगरसेविका स्वाती घोरपडे, नगरसेविका श्वेता लोंढे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.