लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गाच्या मागणीचेच सर्वेक्षण होईल पत्रकार परिषदेत माजी खासदार सुनील गायकवाड यांचा खुलासा
औसा प्रतिनिधी
लातूर ते गुलबर्गा ह्या 145 किलो मीटर अंतराच्या नवीन रेल्वे मार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण दिनांक 5 एप्रिल 2017 रोजी निवेदन देऊन मागणी केल्याप्रमाणे याच रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होईल ,काही दिवसापूर्वी लातूर रोड ते गुलबर्गा, या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण बाबत चर्चा सुरू असून आपल्या मागणीप्रमाणे लातूर गुलबर्गा नवीन रेल्वे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होणार अशी माहिती माजी खासदार डॉ, सुनील गायकवाड यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यालयात औशाच्या पत्रकार परिषदेत देऊन पुराव्यासह खुलासा केला, रेल्वे बोर्ड प्रवासी आणि रेल्वे खात्याच्या फायद्यासाठी सर्व बाबींची अनुकूलता पाहून नव्या रेल्वे मार्गाला परवानगी देत असते, परंतु काही मंडळी याबाबतीत जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत, जिल्ह्याच्या नेत्यांनी विधानसभा मतदार संघा पुरता संकुचित विचार न करता संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचा विचार करणे गरजेचे असते, संसदीय राजभाषा समिती गृहमंत्रालय वर दुसऱ्या उपसमिती चा कार्यकारी संयोजक या नात्याने काम करताना त्या कमिटी मध्ये रेल्वे विभाग ही येत होता त्यामुळे आपण 21 नवीन रेल्वे लातूर ला आनल्या ,उदगीर व लातूर रोड येथे डबल प्लॅटफॉर्म निर्मिती करून लातूर रोडला दादर पुल बनविला, रेल्वे खात्याची जुनी मालमत्ता विकून प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबाबत आपण आग्रह धरला, तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हॉस्पिटलची सुविधा असणारा डबा असावा अशी महत्त्वपूर्ण सूचनाही केली, लातूर गुलबर्गा नवीन रेल्वे मार्गाबाबत बोलताना डॉ, सुनील गायकवाड लातूर येथील औद्योगिक परिसरात तेल व डाळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते ,लातूरची बाजारपेठ नावारूपाला आली असून लातूर गुलबर्गा नवीन रेल्वे मार्ग झाल्यास दक्षिण भारत जोडला जाणार आहे ,लातूर शहरात दोन वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शैक्षणिक हब ने देशाचे लक्ष वेधले आहे, लातूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी रेल्वे मार्गाजवळ राष्ट्रीय महामार्ग असणे आवश्यक असते ,रेल्वे बोर्ड स्वतःचे आणि प्रवाशांचे हीत जोपासते, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त एमआयडीसी रेल्वेमार्गाशी जोडणे आवश्यक असताना आडवळनातून व डोंगरदऱ्यातून रेल्वेमार्ग वळविण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, लातूर गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी 2017 साली आपण लोकसभा सदस्य या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांनी मंजुरी दिल्यामुळे आपण त्यांना धन्यवाद दिले आहे, विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल हे आपले चांगले मित्र असून रेल्वे बोर्डाच्या हिताचा निर्णय ते घेतील, व 187 किलोमीटर आयवजी 145 किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गावर औद्योगिक परिसर व बाजारपेठ जोडल्या जाणार असल्याने सुमारे 500 कोटींचा अतिरिक्त होणारा खर्च रेल्वे मार्गाबाबत होणाऱ्या खर्चाच्या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक निर्णय होईल ,असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 5 एप्रिल 2017 रोजी लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गाची मागणी केल्याचा पुरावा पत्रकार परिषदेत डॉ, सुनील गायकवाड यांनी पत्रकारांना देऊन या विषयाला वेगळे वळण दिले आहे, आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेसाठी उद्योग आघाडीचे आशिष बोरा हेही यावेळी उपस्थित होते,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.