चांगले काम करण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी दे -आ.निलंगेकर,आ.पाटील यांचे तुळजाभवानीला साकडे

 


चांगले काम करण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी दे 

-आ.निलंगेकर,आ.पाटील यांचे तुळजाभवानीला साकडे




लातूर/प्रतिनिधी: राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले पण वर्षभरात राज्याचा विकास होण्याऐवजी राज्य अधोगतीला गेले.या सरकारला चांगले काम करण्याची बुद्धी आई तुळजाभवानीने द्यावी, असे सांगत आ. संभाजीराव पाटील निलंगेकर व आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी निवेदन सादर केले.
   यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की,दि.३०
नोव्हेंबर रोजी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त राज्य सरकारच्या कारभारा संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अशा पत्रकार परिषदा घेऊ नयेत अशा नोटिसा सरकारने आम्हाला दिल्या आहेत. यातूनच राज्य सरकारची मानसिकता स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले.सर्वाधिक बळीही गेले.राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले परंतु अशा अडचणीच्या प्रसंगी मदत करण्याची बुद्धी सरकारला झाली नाही.पदवीधर तरूण तसेच कर्मचारीही अडचणीत आहेत पण त्यांच्या प्रश्नांकडे कोणी पाहतही नाही.राज्य सरकारकडे नैतिकतेचा अभाव आहे.राज्य भ्रष्टाचार तसेच महिलांवरील अत्याचारात मात्र पहिले आहे.
 आ.निलंगेकर म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्याला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे.त्या अनुषंगाने या जिल्ह्याला अधिक सुविधा मिळाल्या असत्या.आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यासाठी पाठपुरावाही केला परंतु मराठवाडा आणि संपूर्ण राज्यावरच या सरकारने अन्याय केला आहे.यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होतो पण ते स्वतः घराबाहेर पडत नाहीत.घरातच कॉरंटाईन आहेत. त्यामुळे आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी या सरकारला सद्बुद्धी दे असे निवेदन सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
उस्मानाबादचे भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे,माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,नागेश नाईक,गुलचंद व्यवहारे,आनंद कदले,विशाल रोचकरी,विकास मलबा,सागर कदम, शिवाजी बोधले अदीसह भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या