जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांना ३० नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल ३० मोठी झाडे लावून आनंदोत्सव साजरा

 

जन्म होता घरात कन्येचा
लेकीची ओवाळूया आरती....
झाडे लावू झाडे जगवू...........
लातूर जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांना ३० नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल ३० मोठी झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मुलीच्या जन्मानिमित्त झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रत्यक्ष कृती ही कित्येकांना प्रेरणा देणारी आहे याबद्दल मा. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांचे खुप खुप कौतुक होत आहे.
एका मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर साजरा केलेला हा आनंदोत्सव विशेष कौतुकास प्राप्त आहे.
यानिमित्ताने बेटी बचाओ-बेटी पढावो हा संदेशही श्रीकांत दांपत्यांनी दिला.
विचारानेच विचार बदलता येतात या हेतूने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या अभिनव उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे.
राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक रस्ता दुभाजकात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी झाडे प्रायोजित करुन स्वतः झाडे लावली.
यावेळी मनपा लातूर उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, सुंदर पाटील कव्हेकर, ओमप्रकाश झुरळे उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समन्वयक डॉ. पवन लड्डा,  नगरसेवक इम्रान सय्यद, गंगाधर पवार, ॲड. वैशाली यादव-लोंढे, सुलेखा कारेपुरकर, पुजा निचळे, स्वाती यादव, प्रफुल्ल पाटील, ॲड. सर्फराज पठाण, प्रमोद निपानीकर, रुषीकेश दरेकर, सुनिल नावाडे, मनमोहन डागा, सिया लड्डा,  प्रसाद शिंदे, मोईझ मिर्झा, ॲड. व्यंकटेश बेल्लाळे, , महेश गेल्डा, सिताराम कंजे, डी. एम. पाटिल, शिवशंकर सुफलकर,  महेश भोकरे, संकेत कुलकर्णी, आनंद सुर्यवंशी, अरविंद फड,  मंगेश शिंदे, गोविंद शिंदे, शैलेश सुर्यवंशी, खंडेराव गंगणे  भुषण पाटिल, सार्थक शिंदे, डॉ. अमृत पत्की, सुहास पाटील, प्रिया नाईक, सीमा धर्माधिकारी, वैभव डोळे, मुकेश ब्रिजवासी,  सुरज पाटील, प्रमोद वरपे, बाळासाहेब बावणे, प्रितम साठे, विक्रांत भुमकर, पवन नावंदर, पृथ्वीराज पवार, विष्णु चव्हाण, कृष्णा वंजारी, विजयकुमार कठारे, नितीन पांचाळ यांनी परिश्रम घेतले.
*







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या