८१ वर्षीय एन.आर.स्वामींंनी केला १५२७ माहिती अधिकार अर्जांचा टप्पा पार



८१ वर्षीय एन.आर.स्वामींंनी केला
१५२७ माहिती अधिकार अर्जांचा टप्पा पार



लातूर,दि.३१ः सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते एन.आर.स्वामी यांनी  कशाहीची भीती न बाळगता ३१ डिसेंबर २०२० अखेर  वयाच्या ८१ व्या वर्षी  माहिती अधिकार अर्जांचा १५२७ अर्जांचा टप्पा पार करुन  एक आदर्श परंपरा निर्माण केली आहे
भीत्री माणसं त्यांच्या प्रत्यक्ष मृत्युंपूर्वी अनेक मरणांचा अनुभव घेत असतात असे म्हटले जाते पण निलंंगा येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार एन.आर.स्वामी यांनी विविध कार्यालयांकडून माहिती मागवून अनेक गैरप्रकार उघडकीस आणले आहेत, त्यांच्या अर्जामुळे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी त्यांना वचकून असतात.
एन.आर.स्वामी यांनी आजपर्यंत माहितीचा अधिकार अधिनियम २००५अंतर्गत ९२९ अ प्रपत्र अर्ज(माहितीचा अर्ज), ४४१ ब प्रपत्रे(प्रथम अपिल), आणि १५७ क प्रपत्र(द्वितीय अपिल) अर्ज असे एकूण १५२४ अर्ज करुन शासकीय,निमशासकीय पातळीवरील भ्रष्टाचार,अनागोंदीची प्रकरणे उघडकीस आणली असून, अनेकांना दंड करविला आहे.
राज्यात २५ मार्च २०२० पासून कोेरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबादचे दैनंदिन कामकाज बंद असल्याने त्याचे अनेक द्वितीय अपील प्रलंबित आहेत.स्वामी यांच्या या धाडस,अनागांेंदी कारभाराविषयीची चिड आणि पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या