३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष स्वागत साधेपणाने साजरे करण्यासाठी कलम १४४ चे आदेश लागू*
लातूर,दिनांक ३०जिमाका-
शासनाने कोरोना विषाणूचा-कोव्हिड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, १८९७, दिनांक १३मार्च २०२० पासून लागु करुन खंड २,३,४ मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे केंद्र शासनाकडून दिनांक २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यांमध्ये सदरचे लॉकडाऊन दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आले होते त्यानंतर शासन व जिल्हास्तरावरुन कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत परंतु कोरोना विषाणुचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्ण संख्या विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाबाबत शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना विहित केल्या आहेत
वरील नमुद परिपत्रकाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कमम १४४ नुसार संपूर्ण लातूर जिल्हयाच्या हद्दीत ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत साधेपणाने करणे बाबत पूढील प्रमाणे आदेशे निर्गमित केले आहे
कोरोनाच्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दिनांक ०१ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग- सामाजिक अंतर राहील असेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे
विशेषत- लातूर जिल्हयातील अनेक शहरामध्ये नागरिकांची गर्दी होत असते त्यादृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येऊ नये ध्वनीप्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील तसेच या परिपत्रकानंतर ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता १८६०, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही असेही आदेशात नमुद केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.