चांगभलं नारी चेतना साठी केंद्राच्या योजनासाठी पाठपुरावा करू माजी खासदार डॉ, सुनील गायकवाड

 चांगभलं नारी चेतना साठी केंद्राच्या  योजनासाठी पाठपुरावा करू  माजी खासदार डॉ, सुनील गायकवाड






औसा प्रतिनिधी


 चांगभलं नारी चेतना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी महिला विकासाच्या विविध योजना केंद्र सरकार मार्फत मिळवून देण्यासाठी आपण निश्‍चितच पाठपुरावा करू, असे प्रतिपादन माजी खा, डॉ, सुनील गायकवाड यांनी केले, औसा येथे चांगभलं नारी चेतना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ,केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर व कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे हे माझे जुने सहकारी असून महिलांच्या उन्नतीसाठी आपण त्यांच्याकडे निश्चित पाठपुरावा करू ,असेही डॉ, सुनील गायकवाड शेवटी म्हणाले,मागील पाच वर्षात या संस्थेने महिलासाठी भरीव कामगिरी केली असून येणाऱ्या काळात उत्तरोत्तर प्रगती होईल अशी अपेक्षा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी बोलताना व्यक्त केली,  मौलाना अबुल कलाम आझाद चौक येथे आयोजित कार्यक्रमासाठी सर्व श्री श्रीकांत रांजणकर,  अरविंद कुलकर्णी, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, संतोष सोमवंशी, सुरेश भुरे, हनमंत राचट्टे,प्रा,सुनील नावाडे,श्रीमती रंजना चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, चांगभलं नारी चेतना संस्थेच्या कार्या विषयी प्रस्ताविकातून प्रा,सोनाली गुलबिले यांनी माहिती विषद केली, बांधकाम व इतर कामगार खात्या मार्फत मिळणाऱ्या योजनाची माहिती यावेळी देऊन या योजना मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही  सांगण्यात आले ,कार्यक्रमासाठी असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते, यावेळी श्रीमती रंजना चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज गोमदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा, शिव मुरगे यांनी केले ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या