वीर शहीद जवान नागनाथ अभंगराव लोभे यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतले अंत्यदर्शन, वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

 

वीर शहीद जवान नागनाथ अभंगराव लोभे यांच्या पार्थिवाचे

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतले

अंत्यदर्शन, वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली







 

लातूर प्रतिनिधी : २३ डिंसेबर २०:

   भारत-चीन सीमेवर सियाचीन येथे कार्यरत असतांना शहीद झालेले जवान नागनाथ अभंगराव लोभे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी लातूर जिल्हयातील उमरगा (हाडगा) येथे दि. २३ डिंसेबर बुधवार रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पन केले अभिवादन करून श्रध्दांजली वाहीली. लोभे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. राज्यशासन या कुटुंबाच्या सोबत असल्याचे सांगून त्यांना धीर दिला.

    लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील उमरगा (हाडगा) येथील वीर जवान नागनाथ अभंगराव लोभे हे भारत–चिन सिमेवर सियाचीन येथे कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले. त्यांचे पार्थिव सिक्कीम येथून आज बुधवार रोजी त्यांच्या मुळगावी उमरगा (हाडगा) येथे आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी वीर शहीद जवान नागनाथ अभंगराव लोभे यांच्या पार्थिवाचे अंतीम दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानाच्या कुटुंबीयास शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.

    लातूर जिल्हा पोलिस दल तसेच भारतीय लष्कराच्या वतीने वीर शहीद जवान नागनाथ लोभे यांना मानवंदना देण्यात आली. दरम्यान यावेळी सुभेदार एस.डी.चौगुले, नायब सुभेदार सूनिदर सिंग, नायक नरेश कुमार, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सरपंच अमोल बिराजदार, तहसीलदार गणेश जाधव, उप विभागीय अधिकारी विकास नाईक, संजय पवार अशोकराव पाटील निलंगेकर यांनी विर शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

   लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहराध्यक्ष किरण जाधव, अभय साळुंके, समद पटेल यांच्यासह हाडगा उमरगा ग्रामस्थ, जिल्हावासिय नागरिक, महिला भगिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या