अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या विविध जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर!
लातूर जिल्हा प्रतिनिधी:
*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *लातुर* येथील आफरीन खान यांची *अल्पसंख्याक महिला लातूर शहर अध्यक्षा* पदी निवड तर हदगाव *जालना* येथील नरहरी राठोड यांची परतुर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *नांदेड* येथील शेख अब्दुल यांची नांदेड शहर सहसचिव पदी निवड करण्यात आली. तर *उस्मानाबाद* येथील मुजीब मकानदार यांची अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पदी निवड करण्यात आली. तर *औंढा हिंगोली* येथील अलाउद्दीन काजी यांची औंढा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *यवतमाळ* येथील मौलाना शेख मदार मिल्ली यांची यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *मुंबई* येथील शाहरुख मुलाणी यांची महाराष्ट्र प्रदेश मंत्रालयीन सचिव पदी निवड करण्यात आली. तर सिल्लोड *औरंगाबाद* येथील शेख मोहम्मद इम्रान जमील यांची सिल्लोड तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. तर *नागपूर* येथील पत्रकार हाजी मो.तारीक यांची नागपूर जिल्हा सदस्य (मेंबर) म्हणून निवड करण्यात आली. तर *जाजनुर लातूर* येथील रियाज शेख यांची जाजनुर शाखा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश संघटक डॉ. सुनील जाधव यांनी* निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
*माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.