मंगळवारी निलंगा बंद
निलंगा:दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दि.8 डिसेंबर मंगळवारी देशव्यापी बंद मध्ये निलंगा ही बंद राहणार आहे शेतकरी बांधवाना नको असलेले कायदे रद्द करण्या बाबत मागील 10 दिवसापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करीत नाही त्याचा निषेध म्हणून देशभरात बंद 8 रोजी बंद पुकारण्यात आला आहे त्याचाच भाग म्हणून निलंगा बंद मध्ये सहभागी होणार आहे तरी या बंद मध्ये सर्वांनी सहभागी होऊन शेतकरी बांधवाना पाठींबा द्यावा असे आवाहन काँग्रेसचे अभय साळुंके, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील ,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इस्माईल लदाफ,सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे,शेकाप चे नारायण सोमवंशी,गोविंद शिंगाडे,सुधाकर पाटील,बबन चव्हाण, असगर अन्सारी आदी ने केले आहेत

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.