औसा
आफ़ताब शेख
२९ - ऐतिहासिक औसा शहर गेल्या 10 वर्षात खुप वाढत आहे. तालुक्याचा विस्तार भूकंपानंतर व जसा जसा विकास होत गेला तसा वाढला आहे. मात्र या वाढलेल्या वस्त्यांमध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधांचा अभाव नेहमी जाणवत होता. अफसर शेख यांनी आघाडी सरकारच्या समोर या ठिकाणच्या समस्या वेळोवेळी मांडल्या त्या अनुषंगाने प्रयत्न केला पण हद्दवाढ ही कोणत्या ना कोणत्या कारणाने होत नव्हती. अनेक जण राजकीय द्वेषापोटी या हद्दवाढीचा विरोध करत होते. या सर्व विरोधकांचा सामना करत आघाडी सरकार समोर मागील वर्षी हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. त्याचा पाठपुरावा वेळोवेळी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला. त्या प्रस्तावाला आज रोजी मान्यता मिळाल्याचे घोषित करण्यात आले. अनेक दिग्गज मंडळी म्हणत होती की हद्दवाढ यांच्या कडून होणार नाही .मात्र सर्वांच्या समोर 1985 नंतर दुसरी हद्दवाढ राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली झाल्याचे अफसर शेख यांनी सांगितले. हद्दीबाहेरील नागरिकांनी सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी वेळोवेळी मागणी केली. मात्र हद्दवाढ हा प्रश्न पुढे करून त्यांना नेहमी डावलण्यात आले होते. भविष्यात त्यांनी वेळोवेळी समस्या मांडल्या त्या सर्व हदी बाहेरील समस्या सोडवतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नगराध्यक्ष अफसर शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शासनाच्या या निर्णयाचे अभिनंदन केले. या प्रसंगी नविन वस्ती मधील नागरिकानी नगराध्यक्ष Dr अफसर शेख व जावेद शेख व अन्य नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले.
लातूर रिपोर्टर न्यूज़
पहा वीडियो
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.