थंडिपासून गरीब,अनाथांच्या रक्षणासाठी लातूरकरांनी कपडा बँकेला गरम कपडे दान करावेत.

 थंडिपासून गरीब,अनाथांच्या रक्षणासाठी

लातूरकरांनी कपडा बँकेला गरम कपडे दान करावेत...!




लातूर/ प्रतिनिधी ः सध्या लातूरसह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात थंडीने काहूर माजवला आहे. नुकतेच अवघ्या जगात कोरोनाच्या प्रादुर्भावाने सावरत असलेल्या लातूरकरांना या थंडीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अशातच शहर आणि परिसरात अनेक बेघर, अनाथ आणि गरीब लोकांना मात्र या थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे घेता येणं शक्य नाही, म्हणूनच थंडिपासून या गरीब, अनाथांच्या रक्षणासाठी लातूरकरांनी त्यांना नवीन गरम कपडे अथवा ब्लँकेटस् कपडा बँकेला दान करावेत असे आवाहन लातूर कपडा बँकेच्या वतीने करण्यात येत आहे.

माणूस म्हणून वावरताना आपल्यासारख्याच हाडामांसाच्या दिसणार्‍या व्यक्तिला आपलं समजून आपण  त्यांना पुढे येऊन सहकार्य करण्याच्या उदात्त भावना प्रत्येकाना जोपासावी. त्याच निरपेक्ष आणि औदार्यपूर्ण भावनेतून लातूरच्या शिवाजी चौकातील कपडा बँकेची स्थापना होऊन चार वर्षे नुकतेच पूर्ण झालेले आहेत. या कपडा बँकेत आजपर्यंत अनेक म्हणण्यापेक्षा जवळपास 7 लाख कपड्यांचे गरजू लोकांना वाटप करण्यात आलेले आहे. त्याच कामाचा वारसा पुढे चालवत लातूर कपडा बँकेने थंडीपासून गोरगरीब, बेघर व अनाथांचा बचाव करण्यासाठी हे आवाहन केले आहे.

लातूर शहरासह परिसरात अनेक गरीब, अनाथ, झोपडीत राहणारे आणि बेघर राहतात. अशांना वाढलेल्या थंडीपासून बचाव करण्यााठी लातूर शहरातील दानशुरांनी लातूर कपडा बँकेकडे नवीन गरम कपडे, स्वेटर्स, ब्लँकेटस, चादरी, मफलर्स सारखे गरम कपडे द्यावेत असे आवाहन करण्यात आले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या