लातूर कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय
लातूर-लातूर येथील कनिष्ठ न्यायालय क्रंमाक 6प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यु.के.गंगणे मॅडम यांच्या न्यायालयात आरोपी शंकर रामा चव्हाण मु.पो.समशापूर,ता.रेणापूर यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखा नळेगाव येथील धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने दीड वर्षाची शिक्षा व 30,000 रूपये दंड ठोठावला.
या घटनेची हकीकत अशी की, शंकर राम चव्हाण यांनी 1997 मध्ये महेबुब पटेल रा. चिंचोलीराव वाडी लातूर यांच्याकडून 15,000 रूपये तीन महिन्यांनी परत करतो म्हणुन हात उसने घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी पुढील तारखेचा धनादेश फिर्यादी महेबुब फतेेखॉ पटेल यांना दिला होता. बॅकेत धनादेश वटवण्यास पाठवल्यानंतर तो धनादेश न वटल्याने परत आला. त्यामुळे फिर्यादी महेबुब पटेल यांनी न्यायालयात कलम 138 प्रमाणे 1999 मध्ये दावा दाखल केला होता. सन 2002 पर्यत हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ठ होते. परंतु आरोपीचा आकरा वर्ष ठावठिकाणा नसल्याने ती फाईल डोअरमेंट मध्ये गेली होती.आरोपीच्या नावे वारंट निघाले होते. सन 2020 मध्ये आरोपीस पोलीसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली.
लातूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रंमाक 6 यांनी आरोपीस धनादेश न वटल्याप्रकरणी एस.सी.सी. क्रंमाक 101/1998 मध्ये दिड वर्षाची शिक्षा व धनादेशाच्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम रूपये 30,000 दंड आकारण्याची शिक्षा ठोठावली.
या खटल्याचे कामकाज फिर्यादीच्या वतीने अॅड.लालासाहेब दरेकर अॅड.शाहरूख खालेक पटेल यांनी पाहीले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.