लातूर मनपा हददीत किमान ३३ टक्के ग्रीन कव्हर असावे
शहराचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून
त्यावर तातडीने अमंलबजावणी करावी
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या
महापौर, आयुक्त आणि संबंधितांना सुचना
लातूर प्रतिनिधी : ६ जानेवारी २१ :
लातूर शहरासाठी नव्याने सर्वांगीण विकास आराखडा तयार करावा त्याची अंमलबजावणीही तातडीने करावी या आराखड्यात प्रामुख्याने महापालिका हद्दीत किमान ३३ टक्के ग्रीन कव्हर असावे या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे आयुक्त श्री टेंकाळे यांच्यासह संबंधितांना दिल्या आहेत.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांचा विभागनीहाय व्यापक आढावा लातूर येथे नुकताच घेतला आहे. या आढाव्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त श्री. देवीदास टेकाळे व सर्व विभाग प्रमुखांना लातूर शहराचा सर्वांगीण विकास अराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या अराखडयात लातूर महानगरपालिका हद्दीमध्ये किमान 33 टक्के ग्रीन कव्हर असावे या दृष्टीने वृक्षारोपन करण्याचे दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले आहे.
लातूर शहरात ग्रीन कव्हर निर्माण करीत असतानाच त्यासोबतच शहरांमध्ये वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, पार्कस, चिल्ड्रण पार्कस, प्लेग्राउंड, सिनीअर सीटीझन पाँइट, पब्लिक टॉयलेट, वॉटर फाउंटन, ड्रीकींग वॉटर यासह महत्वाच्या सुविधांचा या सर्वंकष आराखड्यामध्ये समावेश करून तो सादर करावा या आराखडयाची तातडीने अमंलबजावणी करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी महापौर, आयुक्त व संबंधितांना दिल्या आहेत.
-----------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.