सा.लातुर रिपोर्टर च्या वतीने पत्रकार दिनांनिमित्त पुरस्कार प्रदान..
सा.लातुर रिपोर्टर च्या वतीने पत्रकार दिनांनिमित्त पुरस्कार प्रदान..
म.मुस्लिम कबीर यांना अॅड.मुजीबोद्दीन पटेल जिवन गौरव पुरस्कार, तर मुख्तार मन्यारी यांना मौलवी हबीबोद्दीन पटेल जनसेवा पुरस्कार...
औसा(प्रतिनिधी) आवाज सर्व सामान्या पासुन सरकार पर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकार करतो.पत्रकारिता हा पेशा नसुन सेवा आहे.असे मत माजी नगरसेवक अॅड.समीयोद्दीन पटेल यानी व्यक्त केले.औसा येथुन प्रकाशीत होणा-या सा.लातुर रिपोर्टर च्या वतीने दर्पन दिनां निमित्त पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
सा.लातुर रिपोर्टर च्या वतीने ज्येष्ट पत्रकार म.मुस्लिम कबीर यांना अॅड.म.मुजीबोद्दीन पटेल राज्य स्तरिय जिवन गौरव पुरस्कार 2020 तर पत्रकार मुख्तार मन्यारी यानां मौलवी हबीबोद्दीन पटेल जनसेवा पुरस्कार 2020 देऊन गौरवित करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार म.मुस्लिम कबीर यांनी सांगितले की,आज पत्रकारिता क्षेत्रात फार मोठे बदल झाले आहे. चॅनेल्स च्या माध्यमातुन " अब तक" बातम्या पाहिले तरी सकाळी वर्तमानपत्र वाचल्या शिवाय चैन पडत नाही.म्हणुन वर्तमानपत्राचे महत्त्व अबाधित आहे.आज स्थानिक वर्तमानपत्रानां हर प्रकारे मदत करण्याची गरज आहे.यावेळी प्रमुख पाहूणे अॅड.समीयोद्दीन पटेल,मुख्याध्यापक शफीयोद्दीन पटेल,मुफ्ती याकूबसाब कास्मी,युवा उद्दोजक रिजवान पटेल,जिशान पटेल,संपादक मजहर पटेल,अॅड.इकबाल शेख,पत्रकार जाफर पटेल,एम.बी.मनियार,नदीम सय्यद,इलियास चौधरी,शहाब कबीर,जाकेर शेख,पाशा शेख,प्रा.बी.जे.शेख,गणेश काळे,फजले मुबीन,राजीव कसबे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमच्या सुरुवातीला कोरोना काळात मृत्यु पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजलि वाहण्यात आली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संपादक मजहर पटेल तर आभार अॅड.इकबाल शेख यांनी मानले.
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.