युवकांनी रक्तदान चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे
- पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे प्रतिपादन
लातूर - covid-19 जागतिक महामारी सुरू आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी युवकांना रक्तदान चळवळीत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्या दृष्टिकोनातून लातूरमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर व महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग व हिरेमठ पेट्रोलियम,साखरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयाच्या संस्कृतिक सभागृहामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, विभागीय उपाध्यक्ष दयानंद जडे, मराठवाडा सचिव दीपरत्न निलंगेकर, हिरेमठ पेट्रोलियमचे संचालक श्रीकांत हिरेमठ, शासकीय रक्तपेढीचे डॉ. के. टी. दळवी, पर्यवेक्षक प्रा.मनोहर कबाडे, डॅा.श्रीकांत गायकवाड, N.C.C.ऑफिसर कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॅा.शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई, प्रा. टी घनश्याम व पत्रकार अशोक हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
पुढे बोलताना निखिल पिंगळे म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. भारतीय संस्कृती ही दातृत्व वृत्तीची आहे त्यामुळे युवकांनी मानवतेच्या उदात्त भावनेने रक्तदान चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होणे ही एक काळाची गरज आहे,असे ते म्हणाले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले की, महाविद्यालयीन युवकांनी रक्तदान चळवळीमध्ये स्वच्छेने सहभागी होऊन मा.मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोक देडे म्हणाले की, आज रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे असे सांगून या शिबिरा बाबत समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे म्हणाले की, आजचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयात पत्रकार संघाच्या सहकार्याने संपन्न होत आहे याचा अत्यानंद होत आहे. या चळवळीला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार, रासेयो स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोलीस अधिक्षक यांच्या स्वेच्छा रक्तदानाचा आदर्श घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रातिनीधिक स्वरूपामध्ये शेतकरी सय्यद मुक्तार, पत्रकार कलीम पठाण, N.C.C. विद्यार्थी सुग्रीव कोकाटे यांच्यासह २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार संपादित विचारशलाका ग्रंथ मान्यवरांना भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक मनोहर कबाडे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला रेड्डी, प्रा. गुणवंत बिराजदार, पत्रकार संघाचे महादेव डोंबे, लिंबराज पन्हाळकर, अरुण कांबळे, असिफ पटेल, हरून मोमीन, रत्नाकर निलंगेकर, बापू देडे, नितीन भाले, प्रदीप कवाळे, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक, N.C.C. चे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.