पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
लातूर मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीच्या फिरत्या
एटीएम मोबाईल व्हॅनचा शुभारंभ आणि नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन .
लातूर प्रतिनिधी : १ जानेवारी २१ :
नववर्षाच्या पहिल्या दिवशी लातूर मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या फिरत्या एटीएम मोबाईल व्हॅनचा शुभारंभ आणि नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज शुक्रवार दि. १ जानेवारी रोजी सकाळी बी. ४४ संपर्क कार्यालय लातूर या ठिकाणी करण्यात आला.
येत्या काळात १० व्हॅनच्या माध्यमातून शहरातील विविध भागातल्या ग्राहकांसह नागरिकांना चालते फिरते एटीएम मशीन सेवेच्या अभिनव उपक्रमातून आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा लातूर मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीचा मानस आहे. दरम्यान लातूर मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीच्या नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील यावेळी ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हिताची कंपनीचे प्रशांत जाधव, इसरार सगरे, इम्तियाज शेख, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, अडव्होकेट फारुख शेख, इम्तियाज शेख, दगडूअप्पा मिटकरी, रफिक सय्यद, महेश काळे, यशपाल कांबळे यांच्यासह लातूर मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.
__________
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.