पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवडची शपथ पाळली तर हरित लातूर हा नवा पॅटर्न आपण निर्माण करू शकू पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर मनपा आयोजित माझी वसुंधरा अभियान कार्यक्रम संपन्न

 

पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवडची शपथ पाळली

तर हरित लातूर हा नवा पॅटर्न आपण निर्माण करू शकू

 

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत

लातूर मनपा आयोजित माझी वसुंधरा अभियान कार्यक्रम संपन्न

 

स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती,

संस्थाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.










लातूर प्रतिनिधी : १ जानेवारी २१ :

     आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवड यासाठी शपथ घेतलेली आहे ती पाळली तर येत्या काळात हरित लातूरची एक आगळी वेगळी प्रतिमा सर्वांसमोर आदर्श निर्माण करेल व हरित लातूर हा नवा पॅटर्न आपण निर्माण करू शकू अशी अपेक्षा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.

   पालकमंत्री ना. देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर शहर महानरपालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित वसुंधरा शपथ कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी लातूर शहरातील लोकनेते विलासराव देशमुख स्मृती उद्यान या ठिकाणी पार पडला यावेळी ते बोलत होते.

    या कार्यक्रमाच्या सुरवातीस पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण व सखी महिला बचत गट यांच्या कडून सुरू करण्यात आलेल्या पहिल्या मल निःसरण करण्यास उपयोगी ठरणाऱ्या सक्षम मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण यासाठी प्रत्येक लातूरवाशीय कटिबद्ध राहण्याची वसुंधरा शपथ घेण्यात आली.

  यावेळी बोलताना पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहर महानगपालिकेने हरित संवर्धन करता जे काम केले आहे ते कौतुकास्पद असून लातूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम लातूर मनपाने हाती घेतले ते आपण लातूरशीय आज पाहतोय. स्वच्छता अभियानात लातूर शहरातील आज जनजागृती पाहायला मिळते ते विलक्षण आहे. हे करताना कचरा डेपोवर कचरा टाकताना विरोध झाला, आंदोलने झाली, प्रकरण न्यायालयात गेले, हरित लवादाने याची दखल घेत कचरा विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आणि कचरा डेपो परिसरात लातूर शहर मनपाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सुरुवात केली, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यासाठी अतिशय उत्तम काम मनपा कडून करण्यास सुरुवात आता झालीय याचा मनस्वी आनंद होत असून आज लातूर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. यामुळे आज लातूर मध्ये शिक्षणास येणाऱ्या मुला मुलींचे प्रमाण वाढले, शिक्षणासह उद्योग व्यवसाय, लातूरच्या शासकीय कार्यालयात नोकरी साठी विनंती बदलीचे वाढते प्रमाण ही उदाहरणे आज आपल्या समोर आहेत.

लोकनेते विलासराव देशमुख स्मृती उद्यान आणि

परिसर विकसासाठी नवा आराखडा

    लोकनेते विलासराव देशमुख स्मृती उद्यान आणि परिसर आणखी विकसित कसा करता येईल या साठी नवा आराखडा तयार केला जाईल, तसेच या उद्यानात आठवड्यातून एक वेळा आऊटडोअर चित्रपट प्रदर्शित करून सांस्कृतिक विभागा आणखी चालना देता येईल यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. येत्या मार्च महिन्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल लातुरात घेण्याचा सांस्कृतिक विभागाचा मानस असल्याची माहिती ना.अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.

    पुढे बोलताना ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, या उद्यानात आणखी विद्युत रोषणाई, लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले जिम्स, फ्लोरा फाऊंटन सुरू करावे अशा सूचना मनपा प्रशासनाला दिल्या. तसेच लातूर शहर मनपा व जिल्हा प्रशासनाने शहराच्या क्षेत्रफळाच्या किमान ३३ टक्के भाग हरित करण्यासाठी कामाला लागावे यासाठी लागणारे सर्व पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या अपेक्षा लातूर वासियांना आहेत त्या पेक्षाअधिकाधिक काय देता येईल यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अभिवचन देत उपस्थितांना नवं वर्षाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यास प्रयत्नशील

तोपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस

    कोरोना १९ पासून बचाव यात २०२० वर्ष गेले ज्यात सर्वांनी आपापल्या परीने उत्तम काम केले असल्याचे सांगत २०२१ मध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यास प्रयत्नशील असून महविकास आघाडी सर्वतोपरी कटिबद्ध आहे. पाश्चात्य देशातील सध्याची कोरोना लाट पाहता येत्या काळात आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल आणि जोपर्यंत लस येणार नाही तोपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस आहे असे समजून आपल्या जीवन शैलीत लसीकरण सुरू होई पर्यंत बनवावी लागेल असे म्हणत काळजी घेण्याचे आवाहन केले.

   दरम्यान यावेळी लातूर मनपा कडून राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान अंतर्गत आयोजित विविध स्पर्धात विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. यात स्वच्छ सोसायटी अंतर्गत लातूर शहरातील आयोध्या सोसायटी, द्वारका नगर सोसायटी,साई धाम सोसायटी यांना स्वछ शाळा स्पर्धेत नारायण लाल लाहोटी स्कूल, जिजामाता शाळा, खुब्बा इंग्लिश स्कूल यांना स्वच्छ हॉस्पिटल या स्पर्धेत सदासुख हॉस्पिटल, शिवपुजे हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, स्वच्छ हॉटेल स्पर्धेत ग्रांट हॉटेल, वन अँड ओन्ली हॉटेल, संजय क्वालिटी, हॉटेल ब्रीज, स्वच्छ कार्यालय स्पर्धेत बँक ऑफ इंडिया, लातूर शहर मनपा तर ब्रँड अंबेसिडर म्हणून मारुती पवार, स्वामिनाथ गवंडी, महादेव पवार यांच्यासह उत्कृष्ठ स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, कर्मचारी सविता मस्के लातूर वृक्ष च्या सर्व टीमला ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा सहउप आयुक्त मंजुषा गुरमे यांनी करताना भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या घटकाची माझी वसुंधरा अभियानाशी कशी सलग्नता आहे याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार आणि पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक करीत सरकार आणि पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या वर्षपूर्ती बद्दल शुभेच्छा देत लोकनेते विलासराव देशमुख उद्यानच्या रुपात लातूरकरांना मिळालेल्या देखण्या उद्यानाची साक्ष देत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

   यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, किरण जाधव, अशोक गोविंदपुरकर, मोईज शेख, रेहाना बासले, सपना किसवे, आसिफ बागवान, रघुनाथ मदने, तबरेज तांबोळी, अभय साळुंके, रविशंकर जाधव, आयुक्त देविदास टेकाळे, सहउप आयुक्त मंजुषा गुरमे, वसुधा फड, संजय ओहोळ, महेश काळे, डॉ. पवन लड्डा, हकीम शेख, शरद देशमुख, इम्रान सय्यद, प्रमोद जोशी, अविनाश बट्टेवार, विजयकुमार साबदे, दीपक गटागट, सिकंदर पटेल, मोहन सूरवसे, अब्दुल्ला शेख, राज क्षीरसागर, यांच्यासह मनपा सदस्य, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, वृक्ष मित्र, बचत गट महिला भगिनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी माझी वसुंधरा शपथ अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीमेची स्वाक्षरी करून तसेच उद्यानात उभारलेल्या सेल्फी पॉइंट वर सेल्फी काढून ना.अमित विलासराव देशमुख यांनी स्वाक्षरी मोहीम व सेल्फी पॉइंट ची सुरुवात केली. शेवटी कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार रमाकांत पिडगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या