२ वर्षा पासून अण्णसाहेब पाटील अर्धिक विकास महामंडळ योजनेची फाईल दिली असता मंजूर किंवा काहीच प्रतिक्रीया न मिळाल्याने औसा तहसीलदार यांना निवेदन
औसा मुख्तार मणियार
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेची फाईल स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा औसा येथे दिली असता मंजूर किंवा काहीच प्रतिक्रिया न मिळाल्याने औसा तहसीलदार यांना आकाश प्रकाश जाधव पाटील ( एरंडी) यांनी दि.27 जानेवारी 2021बुधवार रोजी एक निवेदन सादर केले आहे.या निवेदनात अशी माहिती दिली आहे की, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ योजनेवतून आपल्या बँकेकडे फाईल सादर केली आहे. तरी दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी तुळजापूर मुख्य शाखेत गेले आहे असे सागण्यात आले व नंतर परत लातूर मुख्य शाखेत पाठवण्यात आले असे सांगितले तरी मी फाईल साठी २५०००/- खर्च करुन अदयाप पर्यंत फाईल न झाल्यामुळे मी निराश झालो आहे. आपणास मा. तहसीलदार साहेब औसा यांचे या संदर्भात पत्र दि. 4 डिसेंबर 2020 रोजी दिले तरी आपण काहीच प्रतिक्रीया दिली नाही. व मी विचारपुस करण्याकरता बँकेत आलो असता फाईल गहाळ झाल्याचे उत्तर मिळत आहे. तरी चार दिवसात मला योग्य तो न्याय नाही मिळाल्यास दि. 3 फेब्रुवारी 2021 रोजी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे .या निवेदनावर आकाश प्रकाश जाधव पाटील यांची स्वाक्षरी आहे.तरी यांची सर्वस्वी जबाबदारी आपल्या बँकेची असणार आहे.असे मराठा शिवसेवक महाराष्ट्र राज्य समीतीचे तालुका अध्यक्ष आकाश प्रकाश पाटील यांनी औसा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.