वीजबिल माफीसाठी एम आय एम कडून बोंब मारो आंदोलन
औसा मुखतार मणियार
औसा: लॉकडाउन काळामध्ये औसा तालुक्यात नागरिकांना जीवन जगणे महत्वाचे होते आणि या काळात कोणतेही काम नसल्याने हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य जनतेचे घरगुती लाईट बिल मार्च 2020 ते डीसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावी ,व वसूली थांबवावी, व लाईट कट करु नये या मागणीसाठी औसा एम आय एम कडून बोंबा बोंब आंदोलन शुक्रवार दि 29 जानेवारी 2021रोजी सकाळी 11;00वा.औसा तहसिल कार्यालयासमोर विज बिलाची होळी करुन बोंब मारुन आंदोलन केले.
कारण प्रशासनास सतत वीज बिल माफीसाठी निवेदने आणि मागणी करूनही तहसीलदार किंवा महावितरण अधिकारी यांनी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि वीज बिल माफीसाठी कोणतेही मार्ग दिसत नसल्याने आता हे अनोखे असे बोंबा बोंब आंदोलन करुन औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी या आंदोलनात एम आय एम नेता औसा अॅड. गफुरूल्ला हाश्मी,एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार,सय्यद कलीम, शेख नय्युम, जावेद कुरेशी,समीउल्ला कुरेशी,एजाज पठाण, इलियास चौधरी आदि उपस्थित होते .यावेळी या निवेदनावर एम आय एम नेते अँड. गफ्रुल्ला हाश्मी, सय्यद मुजफ्फरअली इनामदार, शेख नय्युम, जावेद कुरेशी,समीउल्ला कुरेशी, एजाज पठाण,सय्यद कलीम, इलियास चौधरी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.