पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते हायटेक बिल्डकॉनचा शुभारंभ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ३१ हजार टपाल तिकीटा पासून तयार केलेल्या प्रतिमेचे केले अनावरण.

 

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते हायटेक बिल्डकॉनचा शुभारंभ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ३१ हजार टपाल तिकीटा पासून तयार केलेल्या प्रतिमेचे केले अनावरण.













 

लातूर प्रतिनिधी : 

  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज मंगळवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक भागात हायटेक बिल्डकॉनचा फित कापून शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी प्रकाश बावगे आणि बालाजी कुंभार यांच्या संकल्पनेतून ३१ हजार टपाल तिकिटाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनोख्या भव्य दिव्य  साकारण्यात आलेल्या प्रतिमेचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी बोलताना ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, हायटेक बिल्डकॉन च्या माध्यमातून बावगे कुटुंबियातील नव्या पिढीने पुढाकार घेतला असून हे कौतुकास्पद आहे. या व्यवसाया सोबतच महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यात देखील रेशीम उद्योग वाढावा यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून या करिता प्रयत्न केले जात आहेत असे म्हणत हायटेक बिल्डकॉनला त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बालाजी बावगे यांनी हायटेक बिल्डकॉन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची टपाल तिकीटाच्या माध्यमातून साकारलेल्या प्रतीमेच्या कामाची माहिती दिली.

    यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, ॲड.किरण जाधव, सुरेश पेंसलवार, अविनाश बट्टेवार, विजय टिकेकर, हायटेक बिल्डकॉन माधव बावगे, प्रदीप बावगे, बालाजी बावगे, सुरेश बावगे, महेश बावगे, केदार फुलारी, कुणाल वांगज यांच्यासह कांस्ट्रकशन व्यवसायातील प्रतिष्ठित, नागरिक व बावगे कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.

------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या