नेताजी सुभाषचंद्र बोस हे युवकांच्या हदयातील महानायक ठरले
लातूर-नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जन्मदिनी त्यांना हदयपुर्वक अभिवादन करण्यात आले. सदरील कार्यक्रम गांधी मार्केट मधील श्री.सोनकांबळे यांच्या कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मधुकर मुंडे होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड.सुधाकर अरसुडे यांनी केले व प्रास्ताविक अॅड.मधुकर कांबळे तर आभार प्रदर्शन सुमेध सोनकांबळे यांनी केले.यावेळी अॅड.लक्ष्मण शिंदे यांनी आपले
मनोगत व्यक्त करतान म्हणाले की, आझाद फौज स्थापन करुन त्यांनी चलो दिल्ली चा नारा आपल्या सैनिकांना दिला. कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा ,ये जिंदगी है कौम की कौम पे लुटाये जा हे गीत सैनिकांचे ओठावर खेळवीत जयहिंद चे घोषवाक्य युवकांच्या ओठावर खेळवले. कॅप्टन लक्ष्मी सहेगल यांच्या मदतीने झाशीची राणी फलटण उभी करून हाती शस्त्र घेवून ब्रिटीशांशी संग्राम केला.त्यांनी आझाद हिंद रेडिओ वरून देशाला जागवले. अंदमान निकोबार या बेटाच्या वर स्वारी करीत येथे स्वातंत्र्य भारताचे पहिले आझाद हिंद सरकार 1943 साली त्यांनी स्थापन केले. नेताजी हे दृढनिश्चयी होते. ते आपल्या ध्येयापासुन किंचीतही दुर गेले नाहीत. प्राचार्य मुंडे म्हणाले की, देश गौरव नेताजी महानायक भारतरत्न सुभाषचंद्र बोस यांनी तत्कालीन आयसीएस ची परीक्षा प्रथम क्रंमाकाने उतीर्ण करूनही ब्रिटीशांच्या जिल्हाधिकारी पदावर देश प्रेमामुळे लाथ मारली आणि कॉग्रेसच्या चळवळीत सहभागी झाले. तेथे तब्बल वीस वर्ष काम करताना आपल्या ध्येयवादाला त्यांनी मुरड घातली नाही. 1938 व 1939 साली हरीपुरा आणि त्रिपुरी येथील अधिवेशनात त्यांनी कॉग्रेसचे अध्यक्षपदही मिळवले. 1941 साली कॉग्रेस सोडून फॉरवर्ड ब्लॉक नावाचा क्रांतीकारी पक्ष स्थापन केला. आपल्या राहत्या घरातील ब्रिटीश नजरकैदेतुन शिवाजी महाराजांचा आग्रा येथुन सुटकेचा आदर्श घेत वेशांतर करून ते देशातुन अफगाणिस्तान मार्ग फरार झाले. रशिया,जर्मनी, जपान व इटली या देशाचे ब्रिटीशांची असलेले वैर लक्षात घेवून त्यांनी हाल अपेष्ठा सोसत निस्वार्थपणे शौर्यानी त्यांच्याशी भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर जावुन स्वाभिमानाने मदत मिळवली .या प्रसंगी लातूर येथे नेताजी चंद्रशेखर बोस यांचे स्मारक व्हावे अशी एकमुखी मागणी केली.या कार्यक्रमास अॅड.मधुकरराव कांबळे, अॅड.लक्ष्मणराव शिंदे, अॅड.सुधाकर अरसुडे, एन.के.सोनकांबळे, आर.व्ही.बारूळे, जितेंद्र सुर्यवंशी, नंदू खंडागळे,
अशोक सुतार, अॅड.गुंडेराव बनसोडे, बी.एच.नणवरे, सुधाकर शिंदे, डोंगरे नवनाथ, सुमेश सोनकांबळे आदी स्वयंस्फुर्तीने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.