औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेती मालाची आवक वाढली
औसा मुखतार मणियार
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने 38 वर्षाचे रेकॉर्ड मोडित काढत दहा महिन्यातच 3 लाख 7 हजार 899 क्विंटलच्या आवकचा टप्पा गाठला.यात सर्वाधिक आवक सोयाबीनची असून लातूरसह उस्मानाबाद, परराज्यातून शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येत असल्याने बाजार समितीचे उत्पन्न वाढल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले व उपसभापती किशोर जाधव यांनी दि.27 जानेवारी 2021 बुधवार रोजी दुपारी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.यावेळी पत्रकाराच्या वतीने बाजार समितीचे नुतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार शाल व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सचीन मिटकरी,औसा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजीव सगरे सर, तालुका पत्रकार संघाचे सचिव महेबुब बख्शी, उपाध्यक्ष काशीनाथ सगरे सर, रमेश दुरूगकर, विजयकुमार बोरफळे,दत्ता व्हंताळे,जलील पठाण, शिवकुमार मुर्गे सर, विवेक देशपांडे, विनायक मोरे,एस ए.काझी,मुख्तार मणियार,रोहीत हंचाटे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.