कर्ज व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
औसा(प्रतिनिधी):-दि22जानेवारी कर्ज व नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील (चिंचोली सोन) येथे आज घडली आहे.
सरतापे नागनाथ भानुदास ( वय 40. रा चिंचोली सोन) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे मयत नागनाथ सरतापे यांना 8 एकर शेती आहे. त्यांच्यावर कर्ज होते त्यातच शेतीतून चांगला उत्पन्न न मिळाल्याने, कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे अधिक तपास भादा पोलीस करीत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.