गरजूंना जीवदान देण्यासाठी रक्तदान करा - न्या.कंकणवाडी
आर टी ओ लातूर व रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल च्या शिबिरात ६५ जणांचे रक्तदान
लातूर/ प्रतिनिधी: रक्तदान हे जीवनदान देणारे आहे.आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो.त्यामुळे समाजातील विविध घटकांनी रक्तदानासाठी पुढे यावे,असे आवाहन न्या. सुनिता कंकणवाडी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी न्या. कंकणवाडी बोलत होत्या. शुक्रवार दि.२२जानेवारी रोजी सकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालयात हे शिबिर संपन्न झाले.या शिबिरास लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरासारखे उपक्रम वारंवार घेणे ही समाजाची गरज आहे.यातून खऱ्या अर्थाने समाजसेवा घडते,असेही न्या. कंकणवाडी म्हणाल्या.
या शिबिरात एकूण ६५जणांनी रक्तदान केले.यावेळी रोटरीचे सदस्य रो.राजेश सेन, रो.चंद्रकांत गुंडरे, रो.जितेंद्र कोरे, रो.गिरीश ब्याळे, रो.अजय तापडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. आरटीओ इन्स्पेक्टर सचिन बंग यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जयदीप झांबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे अध्यक्ष नंदकिशोर लोया,सचिव पुरुषोत्तम नोगजा,प्रोजेक्ट चेअरमन द्वारकादास मंत्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रक्त दात्यांचे , डॉ. भालचंद्र पिढीचे व सर्व उपस्थितांचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती पल्लवी शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.