औसा
प्रतिनिधी
काही महिन्यापासून लातूर शहर व औसा तालुका परिसरात चोरांनी सुळसुळाट माजवला आहे अनेक ठिकाणच्या घर फोड्या करून लाखो रुपयांची लूट,सोने,चांदीची लूट व काही लोकांना जखमी करुन चोरांनी आपला हात साफ करुन घेण्याचे सत्र औसा तालुक्यात सुरूच ठेवलेलं आहे याकडे आपले स्थानिक पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे वारंवार जाणवत आहे व जनसमन्यातून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गेल्या आठ दिवसापासून औसा शहरातील देशाचे सौरक्षण करणाऱ्या आजी माजी सैनिक बोकडे तुकाराम पंढरी हे साध्य जम्मू काश्मीर येथे देशाचे संरक्षण करत आहेत यांचे धर फोडून मोठ्या प्रमाणात चोरी करून चोर पसार होतात आणि स्थानिक पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे असे दिसून येत आहे यामुळे औसा शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट तयार झालेली आहे कारण देशाचे सौरक्षण करणारेच व त्यांचे कुटुंब जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेच काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून औसा शहराचे नागरिक पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी वारंवार केली जाते परंतु याची दखल जिल्याच्या पालक मंत्र्यांकडून व जिल्हा उच्च पोलीस अधिकाऱ्याकडून घेतली जात नाही म्हणून जे कोणी याला पोलीस प्रशासनातील निष्क्रिय अधिकारी जबाबदार असतील त्यांना तात्काळ निलंबित करन्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे वि.आ प्रदेशअध्यक्ष मा.विजयकुमार घाडगे पाटील यांनी तहसीलदार औसा यांना निवेदन देऊन केली आहे
अन्यथा येणाऱ्या काही दिवसात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने औसा शहर बंद करुन याचा निषेध नोंदवन्यात येईल असा इशारा ही यावेळी घाडगे पाटलांनी दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.