औशात घरात घुसून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास
माजी सैनिकाचे घर फोडण्याची दुसरी घटना
औसा : औसा शहराच्या पूर्वभागात याकतपूर रस्ता या नवीन वस्तीच्या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरात प्रवेश करुन मारहाण करुन घरातील पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी दि २१ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे.
शहराच्या पूर्व भागात याकतपूर रस्त्यावर वसलेल्या नवीन वस्तीत पन्हाळगड कॉलनीत राहणारे प्रदीप क्षीरसागर यांच्या घरात गुरुवारी दि २१ जानेवारी रोजी मध्यरात्री दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच जण शिरले. प्रदीप क्षीरसागर
आपल्या खोलीत झोपले असताना पाच जण त्यांच्या खोलीत येऊन कपाट उघडत होते तेव्हा त्यांना जाग आली परंतु तीन हत्यारबंद चोरटे डोक्याजवळ व पायाजवळ उभे असल्याने प्रदीप क्षीरसागर शांत पडून राहिले यावेळी चोरट्यांनी क्षीरसागर यांना धमकावले व हातातील सोन्यांची अंगठी काढून दे म्हणून डोक्यात व हातापायावर काठीने व लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाण व आरडाओरडीमुळे शेजारच्या खोलीत झोपलेले घरातील अन्य सर्वजण जागी झाले व आरडाओरडा सुरू होताच चोरटे पळून गेले. या चोरट्यांचा पाठलाग
केला परंतु अंघाराचा फायदा घेऊन ते पळून गेले. दरम्यान प्रदीप क्षीरसागर यांनी सदरील घटनेची माहिती औसा पोलिसांना दिली असता पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर व सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल बहूरे यांनी रात्री अडीच वाजता घटनास्थळास भेट दिली.नाकाबंदी केली परंतु चोरटे पळून गेले. दरम्यान चोरट्यांनी क्षीरसागर यांच्या घरातून सोन्याचे गंठण,अंगठी अशी विविध चार दागिने (किमत ९० हजार रुपये) व कपाटातील रोख ४० हजार रुपये असे एकूण एक लाख ३० हजार रुपये पळविले आहेत. याच वेळी शेजारी राहणारे शिवाजी
शिंदे यांच्या घरातून सोन्याचे गंठण व अंगठी असे ४५ हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे दरम्यान सदरील पाच चोरटे हिंदीतून बोलत होते असे क्षीरसागर यांनी पोलिसांना सांगितले.
पळून जात असताना या चोरटयांचे काही कपडे या भागात पडले आहेत. याप्रकरणी प्रदीप क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन औसा पोलिस ठाण्यात पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याचा गुन्हा अज्ञात चोरट्याविरुध्द नोंदविला असून सपोनि राहूल बहूरे हे अधिक तपास करीत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.