तालुका अध्यक्ष पदी उबाळे तर तालुका उपाध्यक्ष पदी पांचाळ विठ्ठल यांची नियुक्ती
औसा प्रतिनिधी
औसा तालुका प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बालाजी उबाळे तर उप आध्यक्ष पदी पांचाळ विठ्ठल बालाजी यांची निवड
करण्यात आली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.आंबेगावे डी टी यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील डी पि डी सी हॉल. प्रशासकीय इमारत येथे आयोजित कोवि ड योद्धा सन्मान समारंभानंतर घेण्यात आला.यानंतर संघटनेच्या बैठकीत लातूर जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने औसा तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या औसा तालुका अध्यक्ष पदी बालाजी उबाळे तर तालुका उपाध्यक्ष पदी विठ्ठल पांचाळ यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य पदधिकारी उपस्थिती होते. यांच्या निवडीवेळी संस्थापक अध्यक्ष प्रा.आंबेगावे डी.टी, व्यंकट पन्हाळे राज्य उपाध्यक्ष,मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, लक्ष्मण कांबळे मराठवाडा कार्याध्यक्ष, लातूर जिल्हा अध्यक्ष लहू शिंदे ,लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे जिल्हा शहराध्यक्ष अमोल घायाळ,तसेच सर्व तालुक्या चे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थिती होते नवनियुक्त पदाधिकारी सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कार्य कार्यकारिणीचे स्वागत केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.