ग्रामसेवकाची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्धे गाव बसले बेमुदत उपोषणाला
लातूर / प्रतिनिधी ः मौजे पाखरसांगवी येथील ग्रामसेवक विष्णू भिसे यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी अक्षरशः लातूर तालुक्यातील मौजे अर्धे पाखरसांगवी गाव मागच्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. यामध्ये भिसे यांना षडयंत्र रचून सक्तीने रजेवर पाठविले जात असल्याचे गावकर्यांचे म्हणने त्यांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदारांकडे व्यक्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्रामसंसद म्हणून ओळखल्या जाणार्या ग्रामिण भागाच्या विकासाला चालणा देणार्या ग्रामपंचायतीचा कणा असणारा ग्रामसेवक हा एक महत्वाचा घटक असतो. गेली दोन वर्षांपासून पाखरसांगवी ग्रामपंचायतीमध्ये विष्णू भिसे हे अतिशय चांगल्या पध्दतीने कामकाज करत आहेत. तसेच त्यांच्या कामावर गावातील सर्वच स्तरातील नागरिक समाधानी ही होते. त्याशिवाय त्यांच्या पारदर्शक कार्यशैलीमुळे ग्रामस्तरावरील कारभार सुरळीत झालेला आहे.
असे असताना चांगल्या पध्दतीने सुरु असलेल्या कामास खोडा घालण्यासाठी मोजक्या विरोधकांच्या षडयंत्रामुळे गटविकास अधिकारी यांच्याशी संगनमत करुन आर्थिक व्यवहार साधला गेला असल्याचे बोलले जात आहे. आणि यातुनच ग्रामसेवक भिसे यांची बदली करण्याचे षडयंत्र रचुन त्यांना मेडीकल रजेवर जावे किंवा कार्यालयीन चौकशीची धमकी देऊन त्यांचा चार्ज काढून घेण्यास भाग पाडले जात आहे. तसेच ग्रामसेवक भिसे यांना गावातील कारभारातून किंवा ग्रामपंचायतीच्या कारभारातून हद्दपार करण्याचा अटहास केला जात आहे.
कोणत्याही षडयंत्रातून ग्रामसेवक भिसे यांची बदली होऊ नये किंवा ती थांबवावी या मागणीसाठी मौ. पाखरसांगवी येथील ग्रामस्थांनी दिनांक 14 जानेवारी रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. तसे न झाल्यास दि. 22 जानेवारी 2021 रोजी अमरण उपोषणाला बसणार असल्याचा ईशाराही दिला होता. परंतू त्यांच्या निवेदनाला प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी परवा म्हणजे शुक्रवार दि. 22 जानेवारी पासून अमरण उपोषण सुरु केले आहे. सदरील उपोषणा संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधीकारी, पंचायत समिती सभापती, तहसिल कार्यालयाला निवेदनाद्वारे कळविले होते.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.