पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या सहृदयतेचा प्रवाशांनी घेतला अनुभव लातूर_ औसा रस्त्यावर कार व दुचाकीचा अपघात, रस्त्यावर उतरून जखमींना उपचारार्थ रुग्णालयात पाठवले

 

पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या सहृदयतेचा प्रवाशांनी घेतला अनुभव

लातूरऔसा रस्त्यावर कार  दुचाकीचा अपघात,  

रस्त्यावर उतरून जखमींना उपचारार्थ  रुग्णालयात पाठवले








लातूर प्रतिनिधी_

     राज्याचे  वैद्यकीय शिक्षण  सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख आज नियोजित कार्यक्रमासाठी औसा शहरात आले होतेसदर नियोजित कार्यक्रम आटोपून औसा येथून लातूरच्या दिशेने परत येत असताना पेठ नजिक लातूर कडे येणाऱ्या एम.एच.०५ बीएल.९४५ क्रमांकाची कार आणि  दुचाकी क्रमांक एम.एच.२४ .जे.०२५४  यांच्यात अपघात झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पालकमंत्री नाअमित विलासराव देशमुख यांनी तात्काळ आपला शासकीय ताफा थांबविला  या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ रुग्णालयात पाठवलेकारमधील विद्यार्थिनी  त्यांच्या पालकांना विचारपूस करून सुखरूप पाठवून दिले.

यावेळी जखमीवर योग्य आणि तात्काळ उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेतया घटनेतून पालकमंत्री देशमुख यांच्या सहृदयतेचा अनुभव यावेळी लातूर-औसा दरम्यान प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी घेतला आहे.

                                      _____________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या