किल्लारी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करा - आ. अभिमन्यू पवार.
आढावा बैठकीत आमदारांची प्रशासनाला सुचना.
किल्लारी येथील पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनान उपाययोजना करावी याबाबत एक स्वतंत्र बैठक घेवून नागरिकांना पाणीपुरवठा बाबात योग्य निर्णय घ्यावा पाण्याच्या समस्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे आशा सुचना आ. अभिमन्यू पवार यांनी किल्लारी येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
किल्लारी येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत प्रांगणात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ,जि.प.सदस्य सुभाष पवार, सरपंच शैला लोहर,युवराज गायकवाड, महावितरण अभियंता ढाकणे,प्रकाश पाटील, पप्पू बालकुंदे, जयपाल भोसले, डॉ. पडसळगे, रमेश हेळंबे, विजय भोसले, किरण बाबळसुरे आदीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आ. अभिमन्यू पवार यावेळी बोलत होते की तीस खेडी योजना आपण पुनर्जीवित करीत आहोत किल्लारीसह तीस खेड्यांना येणार्या काळात चांगले शुद्ध पाणी मिळेल.सध्या किल्लारी येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाई बाबत स्थानिक व तालुका प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.याचबरोबरोर सार्वजानिक पाणीपुरवठयासाठी स्वतंत्र रोहित्री बसविण्याच्या दुष्टीने महावितरणाने काम करावे.शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणाने तातडीने कामे करावी असे सांगून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.अतिवृष्टी व अन्य समस्याने शेतकरी ग्रासला गेला असताना महावितरणाने सुरू केलेल्या सक्तीच्या वसुलीबद्दल नाराजी व्यक्त करीत येणाऱ्या दिवसात याबाबत एक मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीत निळकंठेश्वर मंदिर, समाजिक वनीकरण, भुकंपग्रस्त भागात वनक्षेत्र वाढवाणे, पीक विस्तार योजना आदीसह महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.या आढावा बैठकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.