रक्तदान राष्ट्रीय कार्यात सहभाग घेऊन करकटटा येथील
शिवभक्तांनी केली शिवजयंती उत्साहात साजरी
लातूर तालुक्यातील करकटटा येथील शिवभक्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करून शिवजयंती विधायक उपक्रमाने साजरी केली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये गावातील ३० युवकांनी रक्तदान केले.
करकटटा येथील युवकांनी कोवीड १९ अनुषंगाने गर्दी व मिरवणूक टाळून शिवजयंतीनिमीत्त रक्तदानाचा उपक्रमाचे आयोजन केले. रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यात ३० युवकांनी सहभाग घेतला. रक्तदान शिबीरात उपसरपंच शाम गाडे, अजयकुमार बिर्ले, वाचनालयाचे ग्रंथपाल नंदकुमार देशपांडे, विशाल पाटील, संतोष मुरूमकर, अजय गावकरी, आश्राप्पा शिंदे, अमोल गायकवाड, सावन मरे, सिद्धेश्वर इंगळे, महेश मरे, सूरज ढोकळे, सुरज गाडे, अनिल गाडे, गणेश दणके, पवन गाडे, महेश दणके, अजय इंगळे, बालाजी शिंदे, किरण दणके, ज्ञानेश्वर इंगळे, बालू ढोकळे, गजानन मुरूमकर, जालिंदर इंगळे, नवनाथ शिंदे, सागर इंगळे, विजय इंगळे, नवनाथ शिंदे, ऋषिकेश मोहोळकर, सागर पाटील, यांनी रक्तदान केले. शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे डॉ. दळवे, डॉ. कंचन भोसले, डॉ. संजय कासले, डॉ. सूर्यवंशी, डॉ. किरण साबळे यांनी रक्तदान शिबिर आयोजनात सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून जर वर्षी करकटटा गावात व्याख्यानमाला आणि रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प गावातील युवकांनी केला आहे.
लातूर तालुक्यातील करकट्टा गाव नेहमीच विधायक आणि विकासात्मक उपक्रमात अग्रभागी असत या अगोदर करकट्टा गावाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, निर्मलग्राम अभियान असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून आपल्या गावचे वेगळेपण स्पष्ट केले आहे. गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विधायक काम करणाऱ्या युवकांना ग्रामस्थांनी संधी दिली आहे,यामुळे भविष्यात यापेक्षा आणखी चांगले उपक्रम गावात राबविले जातील अशी माहिती युवकांनी दिली आहे.
रक्तदान शिबीरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन आणि भगवा फेटा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजनासाठी श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष इश्वर शिंदे, जयप्रकाश वाचनालयाचे ग्रंथपाल नंदकूमार देशपांडे, अजयकुमार बीर्ले, संतोष मुरूमकर, सावन मरे आदींनी परिश्रम घेतले.
-----------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.