छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरांचे उद्घाटन बसवराज पाटील यांच्या हस्ते

 *लामजना ता.औसा येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील  यांनी करुन अभिवादन केले*













*_महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील यांच्या हस्ते श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरांचे उदघाटन करण्यात आले_*


अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजयंती हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. त्याच निमित्ताने आज लामजना ता.औसा येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील 

यांनी करुन अभिवादन केले.जनतेला शुभेच्छा देत सांगितले कि, तमाम भारतीयांना कुळवाड़ी भूषण बहुजन प्रतिपालक क्षत्रिय कुलवंत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार जात धर्म वर्ण लिंग वंश यांचा भेद न करता एकत्र राहून मानवी जीवन सुन्दर व उदात्त बनवावे, अशा शब्दात राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील यांनी जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अभिवादन करतांना औसा न. प.चे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, जि. प. सदस्य नारायण आबा लोखंडे, जि. प. सदस्य एकनाथ शिंदे, मारुती महाराज कारखाण्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, सुग्रिव लोंढे, लामजण्याचे सरपंच फुलारी,उपसरपंच बालाजी पाटील, बजरंग जाधव, संगमेश्वर ठेसे, पं. स. माजी सदस्य बसवराज धाराशिवे, पत्रकार राजु पाटील, विवेक मिश्रा, विजय बाजुळगे, विजय बाजुळगे रामेश्वर मुळे, दतोपंत आळणे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरज बाबळसुरे, सोशल मिडीया अध्यक्ष बजरंग बाजुळगे, प्रणिल उटगे, संजय लोंढे, आनंत चव्हाण, प्रशांत बिडवे, राजकुमार मुक्तापुरे,धनराज बिराजदार, जहीर पटवारी, जीवन पाटील, अमित मुळे, केदार रेड्डे, श्रीमंत बोडके, तानाजी सुरवसे, महेबुब कारभारी आदींसह कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या