थकबाकीच्या नावाखाली शेतकर्यांची लुबाडणूक
करणार्या कर्मचार्यावर तात्काळ कार्यवाही करा
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
करणार्या कर्मचार्यावर तात्काळ कार्यवाही करा
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.20/02/2020
लातूर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या वेळेमध्ये रब्बी पिकांना पाणी देत आहे. परंतु काही ठिकाणच्या डी.पी. जळालेल्या आहेत. त्याबाबत शेतकर्यांनी पाठपूरावा करूनही दोन-दोन महिणे डी.पी. बसविला जात नाही. परिणामी या डी.पी.व वीजबील थकबाकीच्या नावाखाली शेतकर्याची मोठ्या प्रामाणात लुबाडणूक केली जात आहे. त्यामुळे संबंधीत अधिकार्यांनी लक्ष देवून डी.पी.बसविणे व थकबाकीच्या नावाखाली शेतकर्याची लुबाडणूक करणार्या कर्मचार्यावर तात्काळ कार्यवाही करून शेतकर्याला न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन लातूर परिमंळाचे मुख्य अभियंता रविंद्र कोलप, अधिक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामशे आदींना भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आले.
लातूर जिल्ह्यातील महावितरण कार्यक्षेत्रात कृषीपंपाची थकबाकी म्हणून पैसे घेतले जातात. यामध्ये लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील गुणाबाई डी.पी. बसविण्यासाठी दिड महिण्यापुर्वी कृषीपंपाचे बील घेतले. त्याशिवाय 28 हजार रूपये घेतले असून त्याची पावतीही दिली नाही. तसेच गोंदेगाव येथील मुळक डी.पी.साठी बीलाशिवाय 32 हजार रूपये घेतले. लातूर तालुक्यातील साई येथील डी.पी.वरती लोड झाल्यामुळे पर्यायी डी.पी.ची मागणी शेतकर्यांनी केली. त्यांना खर्चाची मागणी केली. याबरोबरच लातूर तालुक्यातील सारसा व निवळी येथील ग्रामस्थांनी नवीन डी.पी. बसविण्याची मागणी केली. ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करून दोषी कर्मचार्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, तसेच कोव्हिड परिस्थिीमुळे विद्युत बीले न भरणार्या शेतकर्यांचे कनेक्शन तोडू नये 1 एप्रिल 2020 नंतरच्या थकबाकीदारांना लेखी नोटीसा देवून बील भरण्यासाठी कालावधी द्यावा, विद्युत पंपाच्या लोडमुळे अथवा नवीन डी.पी.ची मागणी असल्यास त्वरीत सुविधा द्यावी, त्यासाठी पैश्याची मागणी करू नये. या मागणीसह इतर मागण्याचे निवेदन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर परिमंळाचे मुख्य अभियंता रविंद्र कोलप, अधिक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामशे आदींना दिले त्यामुळे या शेतकर्यांच्या प्रश्नाची दखल घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा ईशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.