काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना मातृशोक

 काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना मातृशोक






 औसा प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे  कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गंगादेवी माधवराव पाटील वय 85 वर्ष यांचे गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी दुःखद निधन झाले. मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील यांच्या त्या मातोश्री तसेच युवक काँग्रेसचे नेते शरण बसवराज पाटील यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 1 वाजता मुरूम ता.उमरगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या