छावा मराठा ग्रुपच्या वतीने पदाधिकारी व नगरसेवकांचा सन्मान

 छावा मराठा ग्रुपच्या वतीने पदाधिकारी व नगरसेवकांचा सन्मान









औसा मुखतार मणियार

 औसा शहरामध्ये छावा मराठा ग्रुप च्या वतीने शिव सप्ताहाचे आयोजन केले.  याचे औचित्य साधून छावा मराठा ग्रुप यांच्या कडुन औसा नगर परिषदच्या कौन्सिलने शहरात छत्रपती शिवाजी महाराज मराठा भवन एक्झिबिशन हॉल आणि वारकरी भवन साठी एकमताने मंजूरी दिल्याबद्दल दि.१३ फेब्रुवारी २०२१ शनीवार रोजी रात्री टि पॉईंट औसा येथे छावा मराठा ग्रुपने मराठा समाजाचा बहुमान करणा-या नेत्यासह पदाधिकारी व  नगरसेवकांचा सन्मान केला. यावेळी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांचा सत्कार मठाधिश महंत मा.श्री.राजेंद्र गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये नगरध्यक्ष अफसर शेख  म्हणाले की मराठा भवन आणि वारकरी भवनसाठी जागा देऊन सुसज्ज असे दोन्ही मराठा व वारकरी भवन येत्या 6 महिन्याच्या आत काम पूर्ण करणार असे आश्वासन लोकनियुक्त नगरध्यक्ष यांनी दिले .याप्रसंगी महंत राजेंद्र गिरी महाराज,नगरसेवक जावेद शेख,भरत सूर्यवंशी,गोपाळ धानुरे मेहराज शेख,गोविंद जाधव,रूपेश दुधनकर सौ कीर्तीताई कांबळे, रुपेश दुधनकर,आदिंचा सन्मान ही ग्रुपच्या वतीने केला . यावेळी छावा मराठा ग्रुपचे संतोष सोमवंशी,नागेश मुगळे, रामराव जंगाले, विलास लंगर,संजय रणदिवे, राहुल सावंत, हणमंत पवार, काकासाहेब जाधव आदि नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या